२४ नोव्हेंबर २०२२
वीर-गाथा: ईशान्य भारताचे वीर लचित बोरफुकन
आज २४ नोव्हेंबर म्हणजेच
“लचित दिवस"-अहोम सैन्याचे कमांडर आणि आसामी राष्ट्रवादाचे प्रतीक श्री लचित
बोरफुकन यांची ४००वी जन्मजयंती. (अहोम साम्राज्याने आसामला सुमारे ६५० वर्षे स्वतंत्र
ठेवले. अहोमांनी खिलजीपासून औरंगजेबापर्यंत सर्वांचा पराभव केला).
काल पासून नवी दिल्लीतील
विज्ञान भवनात दोन दिवसीय कार्यक्रम सुरु आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहिलेत, या प्रसंगी आंतरराष्ट्रीय चर्चासत्र
आणि प्रदर्शनाचे आयोजन केले गेले. आज २४ नोव्हेंबर
रोजी पंतप्रधान मोदी लचित बोरफुकनवरील एक पुस्तक राष्ट्राला समर्पित करतील. लचित बोरफुकन
यांच्या जीवनावर आधारित माहितीपटाच्या स्क्रीनिंगचे उद्घाटन गृहमंत्री अमित शहा यांच्या
हस्ते होणार आहे. हा चित्रपट नंतर अनेक प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दूरचित्रवाणी
वाहिन्यांवर दाखवला जाईल.
काही महिन्यांपूर्वी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी इतर राज्यांतील त्यांच्या समकक्षांना पत्र लिहून त्यांच्या संबंधित कक्षेतील शाळा, महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात लचित बोरफुकन यांच्या विषयी एक अध्याय समाविष्ट करण्याची विनंती केली होती.
वीर-गाथा: ईशान्य भारताचे वीर लचित बोरफुकन
श्री लचित बोरफुकन यांस आसामचे "शिवाजी" म्हंटले जाते कारण, ज्यापद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांनी जसा महाराष्ट्रात मुघलांशी लढा दिला तसाच ललित बोरफुकन यांनी मुघलांना आसाममध्ये धूळ चारली होती. १६७१ मध्ये सराईघाटच्या लढाईत त्यांनी आपल्या सैन्याचे प्रभावी नेतृत्व केले. त्यामुळे आसाम काबीज करण्याची मुघल सैन्याची योजना फसली. ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर गुवाहाटी येथे १६७१ साली सराईघाटची लढाई झाली. स्वातंत्र्यापूर्वीची ही सर्वात मोठी नौदल लढाई म्हणून ओळखली जाते. यामध्ये मुघल सैन्याचा पराभव झाला आणि अहोम सैन्याचा विजय झाला.
लचितने सैन्य वाढवले आणि १६६७ च्या उन्हाळ्यात तयारी पूर्ण झाली. त्याच्या सैन्याने मुघल सैन्यापासून गुवाहाटी पुन्हा जिंकून घेतले. गुवाहाटी येथील पराभवाची माहिती मिळाल्यानंतर औरंगजेब याने ढाका येथून रामसिंग यांच्या नेतृत्वाखाली एक मोहीम फौज पाठवली. अहोम सैन्याच्या संख्यात्मक आणि तांत्रिक कनिष्ठतेमुळे, लचितने गनिमी रणनीतीचा अवलंब केला ज्याने मुघल सैन्यापासून यशस्वीपणे सुरक्षित राहिले.
अहोम
सैन्याच्या छोट्या नौका
निर्णायक ठरल्या कारण
मोठ्या मुघल
नौका त्यांच्या तोफांच्या जोरावर त्यांना गुंतवून ठेवू
शकल्या नाहीत. लवकरच दोन्ही पक्षांमध्ये तुंबळ युद्ध झाले
ज्यात मुन्नावर खान
मारला गेला.
खान आणि
इतर प्रमुख अधिकारी गमावल्यामुळे मुघलांना घाईघाईने माघार घ्यावी लागली. रामसिंगच्या नेतृत्वाखालील भूदलांना सुद्धा माघार घ्यावी लागली कारण
मुघलांनी नदीच्या कामाच्या वेळी
त्यांच्या सैन्याची मुख्य योद्धे गमावली होती.
मानस नदीपर्यंत मुघलांचा पाठलाग करण्यात आला,
जेथे लचितने त्या
सैन्याला रोखले. अहोम
विरुद्धची मोहीम फसल्यामुळे रामसिंग रंगमतीला निघून गेला
.
कमकुवत असले
तरी, अहोम
सैन्याने भूभागाचा उत्कृष्ट वापर,
वेळ खरेदी करण्यासाठी चतुर
मुत्सद्दी वाटाघाटी, गनिमी रणनीती, मनोवैज्ञानिक युद्ध, लष्करी बुद्धिमत्ता आणि
मुघल सैन्याच्या-त्यांच्या नौदलाच्या एकमेव कमकुवतपणाचा फायदा घेऊन
मुघल सैन्याचा पराभव केला.
मुघलांनी आसाममध्ये आपले
साम्राज्य वाढवण्याच्या शेवटच्या मोठ्या प्रयत्नातील सराईघाटची लढाई
ही शेवटची लढाई
होती. जरी
मुघलांनी गुवाहाटीची अहोम
राजधानी उजाड
असताना ती
पुन्हा मिळवण्यात यश
मिळवले, तरी
१६८२ मध्ये इटाखुलीच्या लढाईत अहोमांनी नियंत्रण मिळवले आणि
त्यांच्या राजवटीच्या शेवटपर्यंत ते
राखले.
लचित दिवस
लचित बोरफुकन ही आपल्या देशाच्या इतिहासातील सर्वात वीर व्यक्तींपैकी एक आहे. ज्या वेळी आपल्या देशाचा मोठा भाग मुघलांच्या अजगरमिठीत होता, त्या वेळी बोरफुकनच्या शौर्याने आसाम मुघल सम्राट औरंगजेबाच्या साम्राज्यवादी योजनांना हाणून पाडू शकले. आसामच्या इतिहासातील महान सेनापती लचित बोरफुकन यांच्या अदम्य शौर्याचे स्मरण करण्यासाठी, त्यांच्या राष्ट्रवादी आदर्शांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सराईघाटच्या लढाईत आसामी सैन्याच्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी २४ नोव्हेंबर रोजी, देशामध्ये आणि विशेषकरून आसाममध्ये राज्यव्यापी "लचित दिवस" साजरा केला जातो.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील सर्वोत्कृष्ट कॅडेटला लचित
बोरफुकन सुवर्णपदक देण्यात येते.
१९९९ मध्ये जनरल
व्हीपी मलिक
यांनी केलेल्या घोषणेनंतर हे
पदक संरक्षण कर्मचार्यांना बोरफुकन यांच्या वीरता आणि
बलिदानाचे अनुकरण करण्यास प्रेरित करेल
असे सांगितल्यानंतर त्याची स्थापना करण्यात आली.
बोरफुकन यांचा इतिहास आणि
शौर्य भारतातील इतर
राज्यातील अभ्यासक्रमात समावेश केल्याने भारतातील तरुणांमध्ये देशभक्तीच्या आदर्शांचा प्रसार होईल
आणि त्यांना राष्ट्रसेवेसाठी झोकून देण्याची प्रेरणा मिळेल. महावीर लचित
बोरफुकन यांचा इतिहास आणि
शौर्य भारतात आणि
विश्वात पोहोचावा यासाठी आसाम
सरकारने एक
विशेष मोबाईल अँप्लिकेशन आणि वेबसाईट बनविले आहे.
भारताला अखंड
ठेवण्यासाठी ज्या
वीरांनी अविरत संघर्ष केला
असे छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, बाजीराव पेशवे, राणी
लक्ष्मीबाई यांच्याविषयी आजच्या पिढीला माहिती आहे
, मात्र बाप्पा रावळ,
मिहीर भोज,
सुहेलदेव, कृष्णा देवराय, लचीत
बोरफुकन, पुली
थेवर अशी
अनेक नावे
आहेत जे
आजच्या पिढीला माहिती नसावीत, त्यांचा संघर्ष, साहस
पूर्णपणे अवगत
नसावा. जागतिक क्रीडा, कला,
तंत्रज्ञान, व्यापार विश्वात आज
अनेक भारतीय आपला
ठसा उमटवीत आहेत,
हे चांगलेच आहे
. मात्र आजच्या पिढीपर्यन्त भारताचा गेल्या दोन
हजार वर्षांपूर्वीचा खरा
भूगोल आणि
इतिहास पोहचणे हे
सुद्धा अत्यंत गरजेचे आहे. शालेय आणि
उच्चं माध्यमिक शैक्षणिक पुस्तकात हा
इतिहास सामील करता
येईल.
अदम्य शौर्य गाजवणारे, आसामचे “शिवाजी" म्ह्णून ओळखले जाणारे, प्रखर राष्ट्रभक्त सेनापती लचित बोरफुकन यांना त्यांच्या ४००
व्या जन्मजयन्तीच्या
निमित्ताने कोटी-कोटी प्रणाम!
जय
हिंद. जय
भारत. जय
जय भारत
कि संताने!
- धनंजय मधुकर देशमुख, मुंबई
(लेखक, स्वतंत्र मार्केट रिसर्च विश्लेषक आहे. पोस्टमधील माहिती, आकडेवारी, कविता, फोटो इंटरनेट वरुन साभार घेतले आहे.)
लचित बोरफुकन ही आपल्या देशाच्या इतिहासातील सर्वात वीर व्यक्तींपैकी एक आहे. ज्या वेळी आपल्या देशाचा मोठा भाग मुघलांच्या अजगरमिठीत होता, त्या वेळी बोरफुकनच्या शौर्याने आसाम मुघल सम्राट औरंगजेबाच्या साम्राज्यवादी योजनांना हाणून पाडू शकले. आसामच्या इतिहासातील महान सेनापती लचित बोरफुकन यांच्या अदम्य शौर्याचे स्मरण करण्यासाठी, त्यांच्या राष्ट्रवादी आदर्शांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सराईघाटच्या लढाईत आसामी सैन्याच्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी २४ नोव्हेंबर रोजी, देशामध्ये आणि विशेषकरून आसाममध्ये राज्यव्यापी "लचित दिवस" साजरा केला जातो.
(लेखक, स्वतंत्र मार्केट रिसर्च विश्लेषक आहे. पोस्टमधील माहिती, आकडेवारी, कविता, फोटो इंटरनेट वरुन साभार घेतले आहे.)
छान मांडणी केली ...
ReplyDeleteधन्यवाद
Deleteधन्यवाद
Delete