कास की ताडोबा....
सातारा जिल्ह्य़ातले जैववैविध्याने नटलेले ठिकाण म्हणजे "कास" पठार. सह्य़ाद्रीतील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण गेल्या काही वर्षांत पर्यटनाच्या नकाशावर हॉट स्पॉट ठरले आहे. कासचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्यानंतर कासकडे पर्यटकांचा ओघ आणखीनच वाढला.
कास या वृक्षाचे वैशिष्टय़ म्हणजे याची पाने पिकल्यानंतर रक्तवर्णी दिसतात. मार्च महिन्यात फक्त १५ दिवसांच्या कालावधीत यास पांढऱ्या रंगांची फुलं लाल पाकळ्यांसह गुच्छागुच्छाने आलेली दिसतात.
पण कास पुष्प पठाराचे खरे सौंदर्य फुलते ते सप्टेंबर महिन्यात. कास पठार हे कातळ खडकाचे कमी प्रमाणात माती असलेले पुष्प पठार आहे. इथे सुमारे ४०० पेक्षा जास्त फुलांच्या प्रजाती आढळतात. तर एकूण ८५० पेक्षा जास्त प्रजातींच्या वनस्पती आढळतात. यामध्ये प्रदेशनिष्ठ, अतिदुर्मीळ वनस्पतींचा देखील समावेश आहे. रेड डाटा बुकमधील ६२४ प्रजातींपैकी ३९ प्रजाती कास पठारावर आढळतात. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून पठारावर रंगीबेरंगी फुलांचे पट्टे बहरू लागतात. निळ्या, जांभळय़ा, गुलाबी, पांढऱ्या, पिवळ्या रंगांच्या फुलांची आरास इथे सजलेली पाहावयास मिळते.
इथे भेट द्यायची असेल तर ऑनलाइन बुकिंग करणे गरजेचे आहे. हे बुकिंग आत्ताच "फुल्ल" झाले असल्यास आश्चर्य नाही. असो, तर ह्या 10 चौ किलो मीटर पठारात अनेक रंगी, दुर्मिळ व साधारण असे विविध फुले फुलतात. नांदतात. थोडक्यात, कासची बाग फूललीय, बहरलीय.
चंद्रपुर जवळील ताडोबा / पेंच जंगलातील व्याघ्र प्रकल्पात अनेक पट्टेदार वाघ / वाघिणी आहेत. काही ना कारणामुळे हे जंगल आणि तेथील वाघ आजकाल चर्चेत असते.
आज मी सहजच माझ्या मोबाईल फोनची "Contact लिस्ट" बघितली. असे आढळून आले की ही लिस्ट सुद्धा एक "बाग" च आहे. ही लिस्ट "diverse / बहुरंगी" आहे. ह्यात अनेक वयोगटातील, विविध क्षेत्रातील स्त्री - पुरुष, आहेत. अशिक्षित ते उच्च शिक्षित लोक आहेत. ही बाग विविध फुलांची आहे,
त्यात आहेत - नातेवाईक (ज्यांचे प्रोफेशन जास्ती महत्वपूर्ण नसते), डॉक्टर्स, वकील, लेखक, पत्रकार, संपादक, विविध खेळांचे (विशेषत क्रिकेट, टेबल टेनिस) आजी-माजी खेळाडू, प्रशिक्षक,संघटक, गायक, चित्रकार, वादक, कवि, विविध सर्विस देणारे व्यावसायिक, बिल्डर्स, कॉन्ट्रैक्टर, बिझनेस मेन / वुमेन, विद्यार्थी आहेत.
माझ्या क्षेत्रातील (मार्केट रिसर्च), क्लायंट्स (भारतीय /परदेशी), एक्सपर्टस, उद्योजक आहेत.
अभिनेता, नेता, राजनेता, पोलिस, नागरिक सुविधा (BMC), ड्रायवर, शिक्षक. शाळा, कॉलेज, क्लासेस, ऑफिस चे आजी. माजी सहकारी आणि मित्र आहेत. सीनियर's सुद्धा आहेत. मुलींच्या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, त्यांचे पालक आहेत. बिल्डिंग मधील शेजारी, ओळखीचे दिसणारे चेहरे आहेत. घराजवळ असलेल्या मार्केट मधील कामाचे (किराणा, मेडिकल, भाजीपाला, स्टेशनरी) सगळे दुकानदार आहेत. गाडीची डीलरशिप , सर्विस मैनेजर आणि मैकेनिक आहेत. पूजेसाठी साहित्य पुरविणारी मंडळी आणि विविध मंदिरांत आणि घरी पूजा करून देणारे गुरुजी सुद्धा आहेत.
एक्टिविस्ट्स / सामाजिक कार्यकर्ता पण आहेत. कधी कधी ह्या फुलांवर बसलेले "फुलपाखरू" (Casual contacts) पण आहेत.
मात्र सगळेच वृक्ष हे सुगंधी फुल किंवा चविष्ट फळी देतातच असे नाही. काही "अशोका" सारखे उंचचउंच परंतु "फुल" ना देणारे आणि स्वतः मध्ये रमणारे वृक्ष पण आहेत. अर्थात त्यांच्या बाजूला "सोना" चाफा पण आहे, आणि रसदार उसाचे खांब सुद्धा. 🙂 ह्याच बरोबरीने बाभळी सारखे काटेरी झाडे पण आहेत.
LinkedIn / लिंकडीन ह्या व्यावसायिक नेटवर्क वरची माझी बाग मात्र थोडी "वेगळी" आहे. इथे वापरले जाणारे खत "वॉटस्प्प" खतापेक्षा बरेच वेगले आहे. असावे लागते. ह्यात "भारतीय प्रगति" वर भर दिला जातो - मग ही प्रगती क्रिकेट मध्ये पृथ्वी शॉ ची असो की इसरो च्या 100 उपग्रहांच्या यशाची किंवा नवनवीन उपकरणे आणि वस्तुंच्या "मार्केट" ची असो. थोडक्यात "नवीन भारत " ह्या संकल्पनेला केंद्रात ठेऊन विदेशातील आपल्या सहकार्यांच्या आणि क्लायंट्सच्या " भारत ग्यानात" वेळोवेळी भर पडावी हाच एक उद्देश आहे.
अशी ही माझी "वेगवेगळ्या आणि बहुरंगी फुलांची" बाग गेल्या 5-7 वर्षात तयार झालीय. निर्जीव वाटत असले तरी "स्मार्टफ़ोन" च्या मेमरी मध्ये ही बाग जिवंत आहे. तिला सजीव आणि बहरलेली ठेवण्याची पराकाष्ठा करतोय.
तिला फुलवित ठेवण्यासाठी फोन, एसएमएस, ईमेल, व्हाट्सप्प, विडियो कॉल रूपी "पाणी आणि विविध खतांचा" वापर केला जातो. करावा लागतो.
काही ठराविक लोकांना "व्हाट्सप्प" नावाच्या बागेत "ग्रुप रूपी" डौलदार वृक्षावर फूलविलय तर काहींना "डायरेक्ट" मेसेजिंग द्वारे "कनेक्टेड" राखलय. ह्या वृक्षाला जोक्स, सुविचार, फोटो, विडियोचे खत दररोज किंवा जमेल तेवढे टाकले जाते. अर्थात खताचे स्वरूप हे ग्रुप मधिल "फुलां" वर अवलंबून असते - वर्गमित्र व सहकारी असलेल्या ग्रुप मध्ये चेष्टा असलेले, तर आपल्यापेक्षा वयाने आणि कर्तुत्वाने मोठे असलेल्या नातेवाईक, मित्रमंडळी, आणि अधिकारी ह्यांना "सोबर" असे खत टाकले जाते.
घरातील ज्येष्ठ मंडळींना धार्मिक "content" असलेल्या खताची गरज असते. श्रावण, गणपति, नवरात्र ह्या काळात ह्याला "विशेष" मागणी असते, त्यांचा उधाण येतो. कधी-कधी जुनी गाणी किंवा सिनेमा ह्यांचे "मिक्सचर" भारी उपयोगी पडते.
काही "फुलांना" मात्र वर्षातून दोन - चारदाच "पाणी / खत" टाकले जाते. हे विशेष दिवस म्हणजे दिवाळी, दसरा, न्यू इयर, 15 ऑगस्ट असू शकतात.
काही राजकीय मंडळींना त्यांच्या वाढदिवस, कारकिर्दीवर लक्ष ठेवून त्यात अजून भरभराट होईल ह्यासाठी कधी "सल्ले" तर कधी शुभेच्छा रूपी खत टाकावे लागते.
आता आपल्या मोबाइल फोन मध्ये" बाग" फुलवावी कि "जंगल" तयार करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तीक दृष्टिकोन आहे. फक्त एवढे की त्याचे ताडोबा सारखे होऊ नये 😁. आजकाल ताडोबा मधील वाघ "नको झालेल्या गर्दी मुळे" "नाराज" दिसत आहेत. लोकांचा / त्यांच्या गाड्यांचा "जोरदार" पिच्छा करतात आणि त्यांची "पतली " करतात. तेव्हा जपून.
काही लोकांचा ह्या "contact लिस्ट" कडे बघण्याचा दृष्टीकोन हा एका "24X7 सुपरमार्केट" सारखा असतो. "हवी ती वस्तु आपल्याला हव्या त्या वेळी हवीतशी मिळते " ह्या साध्या तत्त्वाचा वापर करून ही मंडळी आपल्या "Contact लिस्ट" मधील contacts "एक्टिवेट" करण्यात यशस्वी होतात.
मी सुद्धा अनेकांच्या "कांटेक्ट लिस्ट" मध्ये आहे. अर्थात त्यांची ही लिस्ट ही कास सारखीच एक बहरलेली "बाग" आहे आणि मी त्या बागेचा "फुल" आहे / असेल असा माझा एक साधा विचार. 🙂
तर मित्रांनो, ठेवा आपली ही" बाग "जिवित.. करा तिला सुशोभित. क्योंकि हर पेड़ / पौधा , हर फुल बहुत कुछ कहता है, बाबू.
आपलाच,
धनंजय मधुकर देशमुख
१७ नोव्हेंबर २०१८

Comments
Post a Comment