"बहोत कुछ कर दिखाया है "
ऑक्टोबर 2014 - दिवाळीच्या फराळाचे आस्वाद घेत संपूर्ण महाराष्ट्रात घरोघरी चर्चा रंगत होत्या. नुकताच जनतेने कौल दिला होता, अपेक्षीत असा नसल्यामुळे एक संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अफवा पसरल्या जात होत्या. युती, मुख्यमंत्री, खाते वाटप या गोष्टींवर खलबते, चर्चा रंगल्या होत्या. किंबहुना रंगवल्या जात होत्या.
सम्पूर्ण देशाचेच नव्हे तर विदेशी मीडिया सुद्धा महाराष्ट्राकडे डोळे लावुन होते.
अखेर 27 ऑक्टोबर 2014 उजाडले, एक नवीन, तेजस्वी, स्वच्छ पहाट घेऊन. होय. ह्याच दिवशी भाजपा मधील मान्यवरांच्या बैठकीत एक अभूतपूर्व निर्णय घेण्यात आला - युवा, अभ्यासू, स्वच्छ, धड़ाडी , मनमिळावू आणि कामगिरी "oriented" असलेल्या श्री देवेंद्र गंगाधर राव फडणवीस ह्यांना महाराष्ट्राच्या अठराव्या मुख्यमंत्री पदी घोषित केले गेले. ज्येष्ठांनी "राजकारण' डावलून" कामगिरी" ला प्राथमिकता दिली. दिवाळी च्या फराळाची चव अजूनच गोडावली.
सम्पूर्ण महाराष्ट्रात एकीकडे आशेचे, नव्या उमेदीचे वातावरण निर्माण झाले. तर दुसरीकडे काही संभ्रमात होते, कारण त्यांना अनुभव किंवा "अन्य" समीकरणे महत्वपूर्ण वाटत होती. कदाचित त्यांना फडणवीस ह्यांचे विदर्भ आणि अन्य "पॉईंट्स" पटले नसावेत.
31 ऑक्टोबर ला मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये एका दिमाखदार सोहोळ्यात देवेंद्र फडणवीस शपथ ग्रहित जाहले.
उद्या ह्या घटनेला चार वर्षे पूर्ण होतायत. आज महाराष्ट्र राज्य पुन्हा एकदा एक प्रगतिशील राज्य म्हणुन गणू लागले.
जागतिक बँकेच्या (world bank) 2017 मधील अहवालात महाराष्ट्र पुन्हा एकदा औद्योगिकिकरण वाढवण्यात , गरीबी कमी करण्यात आणि पगारी नोकर्या निर्माण करण्यात अग्रेसर झाला.
कुठल्याही राज्याच्या प्रगतीत सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विकास महत्वचा असतो. या ऊपर राजकीय स्थिरता सुद्धा तेवढीच महत्वपूर्ण असते.
देवेंद्र फडणवीस ह्यांनी अनेकांना आपल्या बुद्धी कौशल्य, आणि चतुर राजकारणाने चकित केले. सुरवातीच्या काळात या बद्दल संभ्रमता असेलही,. पण गेल्या दोन वर्षांपासून हे चित्रही पूर्ण पणे बदलले. काही महिन्यांपूर्वी पूर्ण पडलेल्या महानगर पालिकेंच्या निवडणूक नंतर तर आता फडणवीस ह्यांच्या राजकारणी मुत्सद्देगिरी वर शिक्कामोर्तब च केला. आज राज्यात स्थिर राजकिय आणि कायदे व्यवस्था आहे.
युवा पीढ़ी देवेंद्र फडणवीस ह्यांना एक "गायडिंग स्टार (आपल्या पिढीचा मार्गदर्शक)" म्हणुन बघतात. मुख्यमंत्र्यांच्या "फेलोशिप प्रोग्रॅम" अंतर्गत अभ्यासू आणि होतकरू तरुण तरुणींना सामील करून त्यांना राज्य कारभाराचा छोटेखानी अनुभव द्यायचा प्रामाणिक प्रयत्न केला गेला. बदल्यात ह्या युवा पिढीचे विचार, त्यांची ऊर्जा आत्मसात करून घ्यायचा उद्देश सफल झाला.
महाराष्ट्र सरकार नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यात अग्रेसर झाले. काही महिन्यांपूर्वी कॅनडा तिल काही अग्रेसित माहिती आणि तंत्रज्ञान कंपन्यानी महाराष्ट्रात सरकारच्या काही खात्यांमध्ये
आर्टिफ़ीशियल इंटेलिजेंस चा वापर करून त्यांना अधिक कार्यक्षम करण्यात उत्सुक दर्शविली आहे.
राज्याच्या विकासाला वेग द्यायचा असेल तर दमदार आणि नवीन काळाच्या पायाभूत सुविधा असणे अत्यंत गरजेचे असते, हे देवेंद्र फडणवीस यांनी हेरले. मागील चार वर्षात सगळ्या महत्त्वपूर्ण शहरात मेट्रो रेल्वेचे जाळे वीणन्याचे सुरू झाले आहे. महाराष्ट्र समृद्धी मार्ग प्रकल्प चे काम सुरू होण्याच्या मार्गावर आहे.
देशातील पहिली बुलेट ट्रेन धावण्याच्या तयारीत असतानाच आता राज्यातील दोन महानगरांमधील प्रवास 'हायस्पीड' करण्याच्या दृष्टीने सरकारने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. वाहतुकीसाठी हायपर लूप तंत्रज्ञान आणण्यात येणार आहे. त्यासाठी अमेरिकेतील कंपनीबरोबर करार करण्यात आला आहे. मुंबई-पुणे मार्गावर या तंत्रज्ञानाच्या साह्याने वाहतूक सुरु केल्यास अवघ्या १५ मिनिटांत हे अंतर पार करणे शक्य होईल.
असल्या मेगा प्रोजेक्टस साठी "मेगा माइंड", "मेगा संकल्प शक्ति" आणि "सॉलिड टीम" लागते. सोबतीला आर्थिक बाजू सुद्धा भक्कम असावी लागते. देवेंद्र फडणवीस यांनी ह्या सगळ्या बाजू अगदी लीलया पेलत राज्याला सुदृढ आणि वेगवान करण्यात यश मिळवले.
बळीराजा हा नेहमीच देवेंद्र फडणवीस सरकारचा केंद्रबिंदू राहिला आहे. त्यांना नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे आणि बारा महिने पाण्याची व्यवस्था करून देण्यात ही सरकार नेहमीच प्रयत्न शील आहे. जलयुक्त शिवार हा कार्यक्रम आणि त्याची उपयुक्तता गावकर्यांनी आत्मसात केली. अर्थात ह्या प्रकल्पात काही गैर सरकारी संस्था सुद्धा कार्यरत आहे. त्यांचे योगदान कौतुकास्पद आहे.
शिक्षण क्षेत्रात सुद्धा आमूलाग्र बदल घडले. नविन अभ्यासक्रमात माहिती तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्यात येतोय. "मेक इन इंडिया" कार्यक्रमातंर्गत "मेक इन महाराष्ट्र / मॅग्नेटिक महाराष्ट्र " यशस्वी पणे राबवला जातोय.
खेळ आणि कला हे नेहमीच युवा पीढ़ी साठी महत्पूर्ण असतात. हे चाणाक्ष पणे जाणून, ह्या युवा पीढ़ी ला "कनेक्ट" आणि "इनवॉल्व" करण्यासाठी महत्वकांक्षी "CM चषक " कार्यक्रम आखला आहे. CM चषक अंतर्गत महाराष्ट्रातील 288 विधानसभा क्षेत्रातील तरुण तरुणींना आपल्या कला आणि खेळ गुण सादर करून मुख्यमंत्र्यांचे मन जिंकन्याची एक न्यारी संधी आहे.
आपल्या अभ्यासू वृत्तीने देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात कार्यक्षम आणि कामगिरी करून दाखवणारी टीम उभी केलीय.
हे सगळे शिवधनुष्य पेलत असताना च देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला एक निर्विवाद आणि स्वच्छ सरकार दिले आहे. ते सुद्धा पक्षातील ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि सहकार्यांना नेहमीच आदर देऊन आणि सोबत घेऊन!!
ज्या वयात "कुछ करते हैं / कुछ करने का प्लान करते है" असे म्हणनाऱ्यांचीच संख्या अधिक आहे, अश्या भाऊगर्दीत देवेंद्र फडणवीस यांनी "बहोत कुछ करके दिखाया " है. नुसती कामगिरीच दमदार झाली नाही आहे तर राजकारण सुद्धा दमदारच आहे.
महाराष्ट्राला गेल्या चार वर्षांपासून एक स्थिर सरकार दिल्या बद्दल मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्यांचे मना पासून अभिनंदन, आणि त्यांच्या पुढच्या यशस्वी वाटचाली करिता मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य "मेगा" होईल ह्यात शंकाच नाही.
आज सगळ्या स्तरातील लोक श्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या प्रामाणिक आणि पारदर्शक प्रयत्नात योगदान करण्यात / जोडण्यात साठी उत्सुक आहेत.
सुप्रसिद्ध शायर मजरूह सुल्तानपुरी साहेबांच्या काही ओळी सहजच आठवल्या
"मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर
लोग साथ आते गये और कारवां बनता गया".
आपले मनमिळाऊ आणि कार्यकुशल नेतृत्व महाराष्ट्रा ला पुढचे 10 वर्ष लाभू देत हीच सदिच्छा.
नमस्कार...
|| ॐ सर्वेशां स्वस्तिर्भवतु (May there be Well-Being in All) ||
|| शुभम भवतु ||
धनंजय मधुकर राव देशमुख
29 ऑक्टोबर 2018

Comments
Post a Comment