"खेळ मांडला "
नवीन आणि युवा मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजप प्रणित भारतीय युवा मोर्चाने सम्पूर्ण महाराष्ट्रात, सगळ्या २८८ विधानसभा मतदार संघात खेळ आणि कला ह्यांचा मिलाफ करून "CM चषक" चे आयोजन केले आहे. क्रिकेट, खोखो, कबड्डी, वॉलीबॉल, कॅरम, कुस्ती, एथलेटिक्स चे खेळ रंगणार आहेत. ह्याच सोबत, रांगोळी, चित्रकला, गायन आणि नृत्य स्पर्धांचे सुद्धा ह्या "खेलात" समावेश आहे. आधी तालुका/ जिल्हा स्तरावर, आणि नंतर जिल्हा अंतर्गत चुरशी मुंबई आणि इतर शहरात रंगणार आहेत. जवळपास 40-50 लाख तरुण /तरुणी ह्यात सहभागी होतील, आणि त्यातील काही मतदार पक्षासोबत जुड़तिल अशी "खिलाडू" कल्पना / आशा ह्यामागे असावी.
असो, राज्यातील बच्चे, नवतरुण आणि तरुण गटाला खेळ आणि कला सादरीकरणाची एक छान संधी आहे. एका परीने पक्षाच्या "नियोजन ", "संघटन" "शिस्तबद्ध अंमलबजावणी" आणि "प्रसिसद्धीची" कसोटी हे खेळ लावतील. देशात आणि राज्यात पुढच्या वर्षी होणार्या निवडणुकांसाठी, पक्षाच्या "आयोजन आणि नियोजन" शक्तीचे एक " ड्राय रन" म्हणुन ह्याकडे कदाचित बघता येईल.
फक्त "साहेबांनी सांगितले म्हणुन आम्ही पोट्टे उभे केले, आता त्यस्नी खेळता येते की नाही आम्हाला माहीत नाही" असे नाही झाले म्हणजे छान.
मात्र, राजकारणासाठी खेळाचा वापर हा काही नवीन नाही, परंतु देशात सम्पूर्ण राज्य स्तरावर आणि एवढ्या "मेगा" स्केल वर कदाचित हे प्रथमच होत असावे. बघुया पुढील दोन महिन्यात हा "खेला" कसा रंगतोय, आणि त्याभोवती काही "राजकारण" गुंफले जाते का ते.
"अनेकांतून एकाकड़े" असा हा प्रवास जनता / मतदार साधताना दिसेल. कारण ह्यात शेवटी विजेता एकच 🙂.
असो.
राजकारणाचा "खेळ" मात्र "ट्वेंटी फोर बाय सेवन (24X7)" रंगत असतो. ह्यात कुठले खेळ, कुठले गट, वेळ, नियम, पद्धत ह्या सगळ्या गोष्टींना बगल दिले जाते. साधारणतः कुठलाही खेळ, सहसा दोन संघ किंवा दोन खेळाडूंमध्ये, समयबद्ध आणि नियमानुसार खेळला जातो. परन्तु, राजकारणाच्या खेळात एकाच वेळी दोनपेक्षा जास्त संघ एकाचवेळी एकमेकांशी झुंझताना दिसतात. ह्यामध्ये बरेचदा एकाच संघातील दोन खेळाडू विरोधी संघातून (अर्थातच छुप्या पद्धतीने) खेळतांना दिसू शकतात. किंबहुना आपण ते अनेकदा बघितले असेल, अनुभवलेले असेल.
कुठलाही खेळाडू, कुठलाही खेळ कधीही खेळू शकतो. ह्यात स्त्री पुरुष, संघ क्षमतेची, वयाची किंवा पूर्व घोषणेची अश्या कुठल्याही नियमाची गरज / सीमा नसते.
बर, ह्यात कुठले खेळ असतिल ह्याचा काहीच नेम नसतो. लाथा मारणे, कोपरखळ्या करणे, उंच उडी, लांब उडी, धक्का बुक्की, ढकला ढकली, पकड़ा पकड़ी, आंधळी कोशिंबीर (ह्या प्रकारात मात्र काही निवडक "ज्येष्ठच" चॅम्पियन आहेत), "तुझ्या घरातून माझ्या घरात " असे कुठलेही खेळ असू शकतात.
बुद्धिबळ सारखे बुद्धि च्या वापराचे खेळ, किंवा "सोशल मीडिया" चा वापर करून "हाय टेक" खेळ सुद्धा खेळला जातो. अर्थात ह्यास भरपुर बुद्धि, आणि आर्थिक क्षमता लागते. चांगले प्रशिक्षक नेहमीच "डिमांड" मध्ये असतात (उदा. प्रशांत किशोर, भाजपा, कॉन्ग्रेस आणि जद (यू)).
कधी कधी तर "international / आंतर राष्ट्रीय" खेळाडू, प्रशिक्षक + प्रशिक्षण, आणि प्रायोजक सुद्धा "आणले" जातात. फेसबुक, केंब्रिज एनालिटिका सारख्या बिग डाटा / बुद्धिजीवी कंपन्या पण "हौशीने" सामील होतात. थोडक्यात हा खेळ "ज्याला झेपेल तो खेळेल " ह्या नियमाने खेळला जातो.
ग्राम पंचायत / वॉर्ड स्तरा पासून सर्वोच्च पदापर्यंत हा खेळ रंगतो, रंगवला जातो. दर पाच वर्षांनी ह्या खेळाचा सर्व स्तरांवर "सार्वजनिक" आयोजन होते. त्याआधी आणि नंतर सुद्धा बरेच "मानपानाचे" खेळ घडतात / घडविले जातात.
पंचवार्षिक खेळांच्या ह्या आयोजनात शेवटी कौल जनतेलाच द्यावा लागतो. म्हणजे पुन्हा एकदा, "अनेकांकडून एकाकड़े" ह्या मार्गाचा अवलंबून काही ठराविक खेळाडूच जिंकतात. जे हरतात ते त्यांच्या खराब खेळीमुळे हरतात असा काही नियम नसतो. कधी कधी त्यांच्या संघाचे" मोठे "खेळाडू त्यांना हरवतात, तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतात.
एक मात्र खरे, आजकालच्या राजकारणी खेळाडूंमध्ये "खिलाडू वृत्ती" दिसते, किंवा ती आणावी लागते. ह्याचे श्रेय सगळ्या राजकारण्यांचे "माननीय मानस काकांना" दिला गेला तर त्याचे नवल नाही. खिलाडू वृत्ती मुळे त्यांचा "मित्र/शिष्य" परिवार सगळ्या पक्षमध्ये आढळतो. त्या धर्तीवर बर्याच पक्ष मध्ये त्यांच्या सारखे "मित्राळू" खेळाडू हेरण्यात / घडवण्यात येत आहेत. काहींना हे आपसूकच लाभले आहेत. कदाचित विदर्भाची किमया म्हणा. कधी कधी आपल्या दुय्यम /दुसर्या रांगेतील खेळाडूंची "विकेट" देऊन स्वतःची टीम शाबूत राखण्याचे "खेळ" सुद्धा खेळले जातात. मात्र ह्यात काही ठराविक "महाभागांनाच " प्रावीण्य आहे.
महाराष्ट्रात सध्या वाघिणी वरून खेळ रंगविला जातोय. ह्यात काही खेळाडू "स्वपक्षातीलच " खेळाडूंना घरचा आहेर देतांना दिसताहेत.
मध्य प्रदेश, राजस्थान येथे सुद्धा "खेलो अपने घर में " खेळ रंगलाय. आधी उमेदवारांवरुन आणि नंतर मंत्री पदावरून हा खेळ रंगणार आहे.
राष्ट्रीयस्तरावर एका हट्टी राजपुत्राने "फायटर विमान" घेऊन "56 फूटी" उड़ी मारून गड़ काबिज करण्याचा खेळ सुरू केलाय. ह्यात तो रोज किती "फाऊल" करतो (किंवा करायला भाग पाडला जातो) ह्या विषयी ट्विटर, व्हाट्सप्प वर गमतीदार चर्चा जोरात सुरू आहेत.
अर्थात, नेहमीच हा खेळ खिलाडू वृत्तीने खेळला जातो असे नाही. काही वेळा धार्मिक, जातिय मुद्दे वापरून सामान्य जनतेसोबत आगीचा खेला खेळला गेला आहे. 2007 मध्ये गुजरात निवडणुकीत "मौत का सौदागर" म्हणुन तर 2008 मधील मुंबई हल्ला सुरू असतानाच टीवी वर एक वरिष्ठ मंत्री "मालेगांव मे जो हुआ उसका..." अशी विषारी आणि विखारी भाषा वापरून हा खेळ "रक्तरंजित" करण्याचा प्रयत्न केला.
सामान्य जनता हा खेळ कधी आनंदाने बघते तर कधी नाराजीने. तिचा कौल मात्र निर्णायक असतो. मागल्या वेळी त्यांच्या नाराजीने अनेक "प्रस्थापितांना" "विस्थापित" केले होते. बघुया ह्या वेळी काय होते ते.
मात्र वस्तुस्थिती अशी आहे का, फार कमी खेळाडू यशस्वी "राजकारणी" होऊ शकले आहेत किंवा फार निवडक "राजकारणी" खेळाच्या "रियल पिच" वरती यशस्वीपणे खेळलेत. हे मात्र खेळेच, सॉरी खरेच..
शेवटी काय, "खेळाचे राजकारण" आणि "राजकारणाचा खेळ, बस खेलते आना चाहिए.
तो, बाबु, खेलो खेल समझ के.
- धनंजय मधुकरराव देशमुख
११ नोव्हेंबर २०१८

Comments
Post a Comment