"यत्र तत्र सर्वत्र"
साल २००५ मध्ये कौटुंबिक "विभक्ति (separation)" च्या दोन घटना ठळकपणे लक्षात राहतात. कधी कुणी विभक्त होतील यावर कुणालाही विश्वास न बसेल अश्या दोन सुप्रसिद्ध कुटुंबांना दुखद "विभक्ति" ला सामोरे जावे लागले.
ह्यातील एक कुटुंब राजकारणातील तर दुसरे व्यापार जगतातील. अर्थात "राजकीय विभक्ति" ही यशस्वी झाली की नाही यावर अनेक मत-मतांतरे असू शकतात.
पण आपण व्यापार जगतातील घटना बघुया. दोन भाऊ विभक्त झालेत. दोघांना मोठ-मोठ्या कंपन्याचे समूह मिळालेत. एका भावाने ज्या व्यवसायात आहोत त्यावरच लक्ष केंद्रित केले, आणि भरमसाठ प्रगती केली. त्याचा व्यापार समूह आज एवढा मोठा झाला की कुठलीही नवीन किंवा "अडकलेली" कंपनी त्याच्या कडे आशेने बघते.
दुसर्या भावाने मात्र, "फास्ट आणि everything" हे सूत्र वापरले. ज्या व्यवसायामध्ये प्रावीण्य नाही अश्या व्यवसायात सुद्धा त्याने उडी घेतली. पॉवर जनरेशन, टेलीकॉम, इंफ्रास्ट्रक्चर अश्या "मेगा" भांडवल प्रणित क्षेत्रात त्याने निवडले (diversification केले). आज 12-13 वर्षानंतर अशी परिस्थिती आहे की एखादी कंपनी सोडली तर त्याचा समूह आर्थिक विवंचनेत /कर्जबाजारी आहे, कर्ज बुडवी प्रकरणात आहेत.
अर्थात, ह्याने कुणाकड़े कमी व्यवसायबुद्धि होती असे काही सिद्ध होत नाही. परंतु, एका व्यक्तीच्या किंवा त्याच्या विश्वासातील समूहाला - वैचारिक आणि प्रत्येक विचार यशस्वीपणे अंमलबजावणी करायची मर्यादा असते (limitations of vision and its successful implementation).
तुम्ही सगळ्याच खेळीत नेहमीच यशस्वी होऊ शकत नाही, पण यशाचे प्रमाण अधिक असले तरच ते यश राहते, वाढते. कदाचित हे सुद्धा एक कारण असावे.
थोडक्यात काय "आली हवा आणि केली मजा" अश्या म्हणीप्रमाणे प्रयत्न फसलेत. मात्र हवे तसे वृद्धी गाठण्याच्या नादात कधी कधी मूळ हातून जाऊ शकते हे ह्यातून अधोरेखित होते.
राजकारण
राजकारणात वृद्धी ही नेहमी फायद्याचीच असते असे नाही. "कॉँग्रेस मुक्त" घोषणा देऊन भाजपने २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश मिळविले. ह्यानंतर झालेल्या अनेक विधानसभा निवडणुकीतसुद्धा पक्षाला यश मिळत गेले, आणि त्यांनी स्वबळावर किंवा समवैचारिक पक्षांसोबत युती करून सत्ता स्थापित केली.
आज घडीला केंद्रात, आणि देशातील १५ राज्यांमध्ये स्वबळावर तर ४ राज्यांमध्ये युती, असे धरून १९ राज्यात भाजपची सत्ता आहे, सरकार आहे. पुढच्या एका महिन्यात ह्या संख्येत थोड़ी फार कमी येऊ शकते. बघुया.
थोडक्यात, "कॉँग्रेस मुक्त" भारत ही नुसती संकल्पना नाही तर ती एक वस्तुस्थिती होऊ शकते हे प्रमाणित झाले. हे होण्यामागची कारणे अनेक असली तरी त्यात भाजपची वाढती लोकप्रियता, किंवा त्यांच्याकडून काही चांगले आणि वेगळे घडेल / घडवे ही जनतेची आशा / अपेक्षा, ही सुद्धा कारणीभूत असू शकतात.
परंतु वरील व्यापारातिल विभक्तिच्या संदर्भातील दुसर्या भावाच्या बाबतीत जे घडले ते इथे सुद्धा घडण्याची शक्यता असू शकते. "यत्र तत्र सर्वत्र" हा विचार कधी कधी दूधारी तलवारीप्रमाणे अंगलट येऊ शकतो.
भाजपच्या राष्ट्रीय फळीतील नेते केंद्र सरकार च्या कारभारात आणि राजकारणात गुंतलेले आहेत. याउपर, आज घडीला १९ राज्यांमध्ये सरकार असल्याने त्या राज्यातील पक्षातील पहिली फळी आणि काही प्रमाणात दुसर्या फळीतील बरेच नेते / सदस्य राज्यकारभारत व्यस्त आहेत, दंग आहेत. सत्तेतले राजकारण आणि सत्तेबाहेरचे राजकारण ह्यात जमीन अस्मानाचा फरक असतो. एकच राजकारणी ह्या दोन्ही परिस्थितीत खूप भिन्नपद्धतिने वागलेला आढळतो किंबहुना त्याला तसेच वागावे लागते.
सत्ताकारणाचा पक्षाच्या कार्यक्षमता आणि संघटनेवर विपरीत परिणाम होऊ शकतो, आणि तो आज बर्याच प्रमाणात निदर्शनास येतो. शेवटी ह्याचा सम्पूर्ण परिणाम पक्षाच्या येणार्या लोकसभा निवडणूक क्षमतेवर होऊ शकतो.
विरोधीपक्षांकडे सद्दपरिस्थितीत "फक्त राजकारण" करण्याशिवाय पर्याय नाही. केंद्र अधिक १९ राज्य अधिक हे समीकरण जर बघितले तर विरोधी राजकारण्यांची संख्या बक्कळ आहे. त्यांना भाजपतिल दुसर्या आणि तिसर्या फळीतील नेत्यांनी यशस्वीपणे थोपवून धरले तर ते नक्कीच स्पृहणीय होईल.
वृद्धी ही "संघटनात्मक / organic" किंवा "निरीद्रीय inorganic" असू शकते. ह्याचे
उदाहरण म्हणजे व्यवसायात बर्याचदा टेकओवर / मर्जर्स किंवा दुसर्या कंपनी चे मोहरे टिपून वृद्धी साधली जाते. बर्याचदा राजकारणात
"इनकमिंग / आयाराम" ह्यांना सामील करून राजकीय पक्ष "inorganic" वृद्धी गाठण्याचा प्रयत्न करतात. हे प्रयत्न नेहमीच यशस्वी होतात असे नाही. असले "इनकमिंग" मर्यादित यश (limited gains for a time frame) मात्र जरूर देऊ शकतात. बर्याचदा पक्षाचे जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते अश्या "इनकमिंग" मुळे नाराज होतात.
अजूनएक म्हणजे, मला असे वाटते की भाजप हा एक "line of order / रांगबद्ध" पक्ष आहे, म्हणजे
पक्षप्रमुख, प्रभागप्रमुख आणि नंतर राज्यप्रमुख आणि मग इतर नेते / कार्यकर्ता. केन्द्रीय स्तरावर विचारविमर्श होत असल्यामुळे म्हणा किंवा प्रभाग प्रभागीय संघटनेमुळे म्हणा, पक्षांतर्गत संवाद असावा. त्यामुळे पक्षाच्या वागण्या-बोलण्यात, चरित्रात एक प्रकारची एकसन्धता दिसून येते. ही बाब चांगली असली तरी ह्या माळेतला एखाद-दुसरा मणि बदलला किंवा त्याची जागा बदलली की त्याचा परिणाम माळेच्या एकसंधते वर होऊ शकतो. गेल्या चार वर्षांत केंद्र आणि राज्य कारभारात अनेक "मणि" नवीन आणि वेगळ्या जबाबदारी मध्ये अचानक व्यस्त झाल्यामुळे पक्षाची "माळ" कधी-कधी वरखाली ओढली जाते किंवा "पोकळी / vaccume" निर्माण झाला असे आढळते. कधी कधी ही पोकळी "इनकमिंग" घेऊन भरण्याचा मोह होऊ शकतो.
ह्याच्या उलट म्हणजे, दुसर्या पक्षांचे उदाहरण घेतलं तर आपल्याला असे आढळेल की ह्यांची संघटना काहीशी "फ्रैंचाइजी मॉडेल" सारखी आहे.
जरी ते राष्ट्रीय पक्ष असले तरी, एक परिवार केंद्रबिंदू मानून त्यांच्या अवतीभवती विविध राज्यातील "मान्यवर /regional satraps " समान अंतरावर / equidistant असल्याचे दिसून येईल. त्यामूळे एखाद्या राज्याचा विषय हा त्या राज्यातील नेत्यांना दिला जातो. थोडेफार " Hub and spoke / हब आणि स्पोक मॉडेल" असल्यामुळे पक्षीय एकसंधता (जी फारशि नाही) काहीशी विस्कळित होत नाही.
भाजप हा पक्ष तसा विचारवंत, संघटना आणि ध्येयाची प्रमाणबद्ध अम्मलबजावाणी करण्यासाठी ओळखला जातो. पक्षातील ज्येष्ठ / जाणकार, आणि परिवारातील विचारवंत ह्या विषयाकडे लक्ष देऊन असतीलच आणि वृद्धीची फार मोठी किम्मत मोजायला लागली जाणार नाही ह्याची ते काळजी घेतील हे मानायला हरकत नाही.
कारण "यत्र तत्र सर्वत्र" नेहमीच फलदायी असते असेही नाही.
कालाय तस्मै नमः.
- धनंजय मधुकर राव देशमुख
13 नोवेम्बर 2018

Comments
Post a Comment