"हूल" की "भूल"?
परवा भारतीय क्रिकेटमध्ये असा एक गम्मतीशिर किस्सा घडला की ज्यामुळे सध्या क्रिकेट जगतात चर्चा सुरू आहे. C K नायडू स्पर्धेत (२३ वर्षा खालील खेळाडू) उत्तर प्रदेश आणि बंगालच्या सामन्यात उत्तर प्रदेश चा फिरकीपटू शिवा सिंह गोलंदाजी करायला आला. त्यानी सुरुवात उजव्या हाताची एक्शन करून केली, मात्र बॉल टाकायच्या आधी पूर्ण 360 अंश फिरून शेवटी डाव्या हाताने बॉल टाकला. अंपायर ने तो बॉल डेड घोषित केला. जर फलंदाज "स्विच हिट " किंवा "रिवर्स स्वीप" करू शकतात तर गोलंदाजीमध्ये असे का नाही होऊ शकत ह्या विषयावर चर्चा, मत प्रदर्शन सुरू आहेत. बघुया ICC ह्यातून काही बोध घेऊन नियमांमध्ये बदल करते का ते. तूर्तास तरी गोलंदाजाचा हा "हूल" द्यायचा प्रयत्न फसला आहे.
मात्र, १९८१ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूज़ीलैंड मधील एक दिवसीय सामन्यात ट्रेवर चपल चा "अंडर आर्म" बॉल हा न्यूज़ीलैंड च्या ब्रायन मैकेंची ला "हूल" देण्यात यशस्वी झाला होता. सध्या "हूल" बाबतीत ICC तसे कठोर दिसतय, कारण एखाद्या फील्डर ने फिल्डिंग करतांना थ्रो करण्याचा "बनावटी" प्रयत्न केल्यास फलंदाजी संघाला 5 रन्स मिळतील, त्यामुळे आता "हूल" वरती एकप्रकारे अंकुश आले आहे. फुटबॉल मध्ये सुद्धा "फेक फॉल / डाइव" ला नियमबाह्य केलेले आहे.
असो, जेवढे "हूल कंट्रोल" होईल तेवढे चांगले.
सामान्य नागरिक मात्र "हुलीचे " वेगवेगळे प्रकार सतत अनुभवत असते. कधी पाऊस "हुल" देतो तर कधी "शेयर मार्केट" तर कधी लाडके "साहेब" मंडळी. मागच्या दोन - तीन वर्षात बरेच "घोटाळे खोर" आपल्या देशातील गुन्हे शाखांना "हूल" देऊन "गायब" झालेत.
हिंदी सिनेमात "हुल " देणे तर सर्रास वापरले जायचे. शोले मध्ये जय - वीरू हे "अंग्रेजो के जमाने के जेलर" ला साध्या लाकडी बोळ्याने बंदूक असल्याची" हुल" देऊन पळून जाण्यात यशस्वी होतात. "डॉन" मध्ये विजय त्याची पिस्टल खाली असतांना सुद्धा "गोली मारूँगा" ही "हुल" सीनियर "डीएसपी साहेबाला" देण्यात यशस्वी होतो.
अर्थात "हुल" यशस्वी करणे हे देणार्याच्या कस्बेवर आणि घेणार्याच्या बुद्धिमत्ता, नशिब, आणि परिस्थितीवर अवलंबून असते.
राजकारणात "हुल" देणे हा प्रकार किती जुना आहे आणि त्यावर कुणाचे प्राविण्य आहे हा शोध निबंधाचा विषय होऊ शकतो.
एकदम ताजे उदाहरण घ्यायचे झाले तर कर्नाटक मधील पोटनिवडणुकीत कॉँग्रेसचा एक नेता भाजप मध्ये गेला, उमेदवार झाला आणि मतदानाच्या दोन दिवसआधी कांग्रेसमध्ये परतला. शेवटी कांग्रेसच ती जागा जिंकली. आता ह्या प्रकरणात कुणी आणि किती जणांनी कुणा-कुणाला "हुल" दिली हा एक मोठा विषय आहे. स्वपक्षीय आणि अन्तर पक्षीय "हुल" प्रकरणात कोण कोण सामील होते हे कधी कळणार नाही. मात्र जनतेसाठी हा करमणुकीचा विषय झाला हे मात्र नक्कीच.
आपल्या महाराष्ट्रात "हुल" देण्याची किमया काही निवडक ज्येष्ठांनाच "अवगत" आहे. कॉपी करणारे कितीही असले तरी "कात्रज चा" घाट लीलया दाखवून सुद्धा "मित्रता" शाबूत ठेवण्याची किमया मात्र "साहेबच" करू शकतात. "कॉपी " बहाद्दर एकतर पकडले तरी जातात नाही "मैत्री" तरी घालवतात, आणि ती एक मोठी" भूल" ठरते.
मागच्या वर्षी गोव्यात कॉँग्रेसला यशस्वी "हुल" देऊन विदर्भाच्या आमच्या लाडक्या भाऊ साहेबांनी ते सुद्धा "साहेबांसारखेच" कर्तबगार आहेत हे सिद्ध केले.
निवडणुकी जसज्स्या जवळ येतील तसे "हुलीचे" प्रमाण वाढणार आहे. सध्या मात्र, धुळ्यातील महानगर पालिकेच्या निवडणूक संबंधी "मुंडकी पायाखाली टाका" हे बोलून नेमकी कुणी कुणाला "हूल" दिली हे अजून गुलदस्त्यातच आहे!!
"जनेऊधारी ब्राह्मण" घोषित करून घेऊन, कैलास मानसरोवर, महाकाल, आणि सतत "टेम्पल रन" करून एका" शिवभक्ता " ची भक्ति "हूल" लागू पडते कि पुन्हा एकदा "फाऊल" होतो हे पुढच्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल.
तूर्तास तरी, जो देई "हूल" त्यालाच मिळे "फूल ". "हूल" घ्या पण" फूल" होऊ नका!!
आपला नेहमीचाच,
धनंजय मधुकर देशमुख
13 November 2018

Comments
Post a Comment