"आणि बिगुल वाजले..."
भाजप+ शिवसेना सरकारने पाचव्या वर्षात यशस्वी पदार्पण केलय. बघायला गेले तर, स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासात फक्त दोन वेळा एखाद्या तत्कालीन मुख्यमंत्र्याने सम्पूर्ण कार्यकाळ पूर्ण केला, श्री वसंतराव नाईक (दोनदा, 1963-67,1967-72)आणि श्री विलासराव देशमुख (2004-8). आता ही संधी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना उपलब्ध आहे. सद्यपरिस्थितीत ते त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील असे चित्र आहे.
परंतु, राजकारणात गोष्टी गृहीत धरणे हा अक्षम्य गुन्हा आहे. कधी कधी एका दिवसात उलथापालथ होते. मा मुख्यमंत्री आणि त्यांचे ज्येष्ठ सहकारी ही वास्तविकता नक्कीच जाणुन आहेत / असावेत.
ह्याच अनुषंगाने आता "posturing" किंवा "पवित्रा घेणे" सुरू झाले आहे. नुकत्याच एका समारंभात मुख्यमंत्री म्हणाले कि त्यांना युती टिकवून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढण्यात स्वारस्य आहे. लोकसभेच्या निवडणुकी साठी त्यांचा फॉर्म्युला ठरलेला आहे, तर विधानसभेसाठी एकत्र चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
मात्र ह्याच वेळी ते "आम्ही एकटे लढण्यास आणि जिंकून येण्यास समर्थ आहोत" हे ही निक्षूनपणे नमूद करण्यास ते विसरले नाहीत. ह्यामुळे विरोधी पक्षातील काही "फेंस सीटिंग" गट नक्कीच सक्रिय झाले असतिल.
गम्मत अशी की, ह्याच वेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या समोक्षच एका विरोधी पक्षाच्या बड्या नेत्याला कधीही अटक होऊ शकते हे भाष्य करतात.
आता ही दोन परस्पर विरोधी विधाने. ठरलेल्या "Strategy" चा भाग असू शकतात किंवा मग काही विसंवाद असावा.
खरी गोष्ट ही आहे की आगामी निवडणुकांचा बिगुल वाजला आहे, मात्र "war cry" ला अजून वेळ आहे.
असो, भाजप आणि शिवसेना युतीचा विषय हा तसा सोपा होता. महाराष्ट्रात "तुम्ही मोठे भाऊ" आणि केंद्रात "आम्ही मोठे" असा साधा सरळ ठोकताळा होता. माझ्यामते कदाचित तो योग्यच आहे. महाराष्ट्र आणि विशेषत मुंबईत शिवसेनेला वर्चस्व दिले तर युतीचे राजकारण आपोआपच ठंड होईल. परंतु वैयक्तिक महत्वाकांक्षा पक्षीय संबंधांवर हावी होताना दिसतात.
ही परिस्थिती बदलली ती 2014 मधील भाजप ला केंद्रात मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे. 2014 विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि राज्यातील / मुंबईतिल काही पक्ष नेत्यांनी (यंग ब्रिगेड, जे राज्याच्या राजकारणात अजून "एस्टॅब्लिश" सुद्धा झाले नव्हते ), "आम्हाला 177 विधानसभा क्षेत्रात बढ़त मिळाली म्हणुन विधानसभेच्या 288 जागांचा आम्हाला मोठा हिस्सा हवाच" असा आक्रमक तोरा / पवित्रा घेतला. ह्यामुळे म्हणा किंवा काही ज्येष्ठ नेत्यांना त्यांच्या "इम्पोर्टेड" सहकार्यांना टिकिट मिळावी म्हणुन म्हणा, एकूण काय महाराष्ट्रातिल "भगवा प्रेमी" जनतेला "अभिमान" असलेली अशी अभेद्य युती तुटली.
चार वर्षांनंतर आता पुन्हा एकदा आट्यापाट्याचा डाव रंगणार आहे. मा मुख्यमंत्र्यांचे शिवसेना पक्ष प्रमुखांसोबत उत्कृष्ट संबंध आहेत हे सर्वश्रुत आहेच, त्यात एक आपुलकी, प्रामाणिकपणा आणि परिपक्वता दिसतो. मुख्यमंत्री युतीचे समर्थक आणि इच्छुक सुद्धा दिसतात. काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या मातोश्री भेटे नंतर भाजप पक्ष प्रमुखसुद्धा ह्यावेळेस युतीला अनुकूल दिसतात.
तसे बघायला गेले तर शिवसेना जरी क्षेत्रीय पक्ष असला तरी त्याचं राजकीय अस्तित्व तसे मोठे आहे. कुठल्याही दोन पक्षांच्या संबंधांत दोन्ही पक्ष प्रमुखांमध्ये आदर आणि कदर असावीच लागते (माझ्या मते, राजा छोटा किंवा मोठा नसतो, तो राजाच असतो). ह्या तत्वाने भाजपतिल ज्येष्ठ ह्या खेपेला राज्यातील नेत्यांना (मुख्यमंत्री सोडून) "लिमिटेड स्पेस" देतील असे दिसते / अपेक्षित आहे. अर्थात हे सगळे येणार्या लोकसभा निवडणुकिच्या निकालांवर अवलंबून राहील. युतीधर्मात "टू वे ट्राफिक" अपेक्षित असतो त्याच अनुषंगाने हे तत्व शिवसेनेला सुद्धा लागू व्हायला हरकत नाही.
आता गम्मत आहे ती दोन्ही पक्षातील दुसर्या रांगेतील शिलेदारांची, आणि आघाडीतिल त्यांच्या "गुप्त" मित्रांची. कोण कुणावर कुरघोडी करतो किंवा कुणाला खेळायला दिले जाते हे आता लवकरच दिसून येईल.
तूर्तास तरी "स्टेटस को / जैसे थे " असे चित्र दिसते. पण लोकसभा निवडणुकी नंतर हे खूप वेग़ाने बदलेल. जर परिस्थिती अनुकूल नसली तर नाणार, बुलेट ट्रेन प्रकल्प किंवा वेगळा विदर्भ हे विषय युती वर हावी होऊ शकतील. अर्थात हे सगळे जनतेसाठी. असली बात तो बंद कमरों मे ही होती है, बाबू!!
(आमची आघाडी झाली आहे फक्त काही जागांचा विषय उरला आहे, असे नुकतेच आघाडी पक्षांनी जाहीर केले. तर त्याच वेळेस "साहेबांचे" एक लाडके अनुयायी मात्र "मातोश्री" भेटीत दंग दिसतात.)
दिवाळीच्या फराळा सोबत ह्या "राजनीती" खेला चा सुद्धा आनंद घ्या. कुणी कितीही म्हटले तरी प्रत्येक लाडू हा गोड नसतो. आमचा "गोड" लाडू (पण मुळात बीनसाखरेचा) घ्या आणि तुमचा "चमचमीत" चिवडा आम्हाला द्या, असे सांगुन काही ज्येष्ठ "कात्रज" चा घाट दाखवण्यात दंग असतिल, तर काही खेळाडू चषक खेळण्यात गुंतलेले असतिल.
अपने को तो बस "फराळ" करना है, बाबू.
जय हो.
- धनंजय मधुकर देशमुख (पाच नोव्हेंबर २०१८)

Comments
Post a Comment