21 जुलै
2021, मुंबई
कोण
आहे
नेता
नीओ
मिलेनियल्सचा?
वैश्विक
शोधकार्य
करणार्यांनी
जन्मकाळाप्रमाणे
पिढ्यांचे
नामकरण
केले
आहे.
उदाहरणार्थ,
जे
1946-64 दरम्यान
जन्मले
त्यांना
“बेबी
बूमर्स”
असे
म्हणतात.
1965-80 दरम्यान जन्मलेल्या पिढीला जनरेशन एक्स (Gen X) म्हणतात
जी
पीढ़ी
1981-96 या
काळात
जन्मली
त्यांना
"मिलेनियल्स
(Millennials)" किंवा “जनरेशन
वाय
(Gen Y)” असे म्हणतात.
जे
1997-2005 मध्ये जन्मले
त्यांना
"जनरेशन
झेड
(Gen Z)" असे म्हणतात. त्यानंतरच्या पिढीला जनरेशन झेड नेक्स्ट म्हणता येईल.
2010
नंतर
जन्मलेल्या
पिढीला
"जनरेशन
अल्फा
(Gen Alpha)” असे म्हणतात.
शास्त्रज्ञांच्या मते
दर
पिढीगत
वैचारिक
मत,
बोलण्याची
तर्हा,
विचार
करण्याची
पद्धत
आणि
जीवनाचा
दृष्टिकोन
बदलतो.
प्राथमिकता
बदलतात.
काळानुसार
तंत्रज्ञान
विकसित
झाले,
प्रगल्भ
झाले.
त्याचा
वापर
प्रत्येक
पिढीने
आपापल्या
पद्धतीने
केला.
प्रत्त्येक
पिढीने
आपला
परिवार
बदलताना
बघितला,
आपले
परिसर
बदलताना
बघितले,
त्यांच्या
डोळ्यादेखत
आसपासच्या
जागा,
राहण्याच्या
व्यवस्था
बदलल्या.
देश
स्वतंत्र
झाल्यापासून
अनेक
घटना
घडल्या,
प्रत्येक
पिढीने
त्यातून
प्रवास
केला,
अनुभवल्या.
उदाहरणार्थ,
बेबी
बूमर्सच्या
पिढीने
नुकताच
स्वातंत्र्य
मिळालेला
भारत,
युद्धात
गुंतलेला
भारत,
आणि
कृषी
आणि
तंत्रज्ञान
मध्ये
स्वावलंबी
होण्याचा
प्रयत्नरत
असलेला
भारत
बघितला
आहे.
जनरेशन
एक्स
आणि
एक्सेनियल्स
(1977-83) जेव्हा जाणती
होत
होती
(वयवर्ष
साधारणतः
12 वर्ष),
त्यांनी
देश
बदलताना
बघितला
- खेळ,
टेलिविजन,
स्टॉक
मार्केट,
तंत्रज्ञान,
व्यापार,
उद्योगधंदे
आणि
अर्थव्यवस्था
बदलताना
अगदी
जवळून
बघितले
आहे,
अनुभवले
आहे.
प्रतिकूल,
खडतर
परिस्थितीतून
बाहेर
येण्याचा
प्रयत्न
करणारा
भारत
बघितला
आहे.
मिलेनियल्स
(1981-96) च्या पिढीने
एक
पुनर्निर्माण
होणारा
भारत
अनुभवलेला
आहे.
तर
जनरेशन
झेड
आणि
अल्फा
या,
भारत
आज
ज्या
वैश्विक
स्तरावर
स्थिरावलेला
आहे
ते
अनुभवत
आहेत.
जेव्हा आपण या वेगवेगळ्या
पिढ्यांचा विचार करतो तेव्हा त्यांची
जडणघडण ज्या काळात (जाण
येते) होत होती,त्या
काळाबद्दल आपल्याला माहिती असणे गरजेचे असते.
जडणघडणीचा काळ हा आयुष्यभर
पुरतो असे म्हणतात,माणूस
त्यात रमतो. तेव्हा कुणाला एखाद्या पिढीशी संवाद साधायचा असेल तर आणि
त्यांचा तसा अभ्यास असल्यास,
छान संवाद साधताना तकलीफ होत नाही.

साधारणतः बेबी बूमर्स ला नवनवीन मोबाईल अप्लिकेशन बद्दल माहिती घेण्याची उत्सुकता नसते, तसेच जनरेशन अल्फा ला स्वातंत्र्य काळात किंवा त्याच्या आसपासच्या कालखंडात जास्त खोलात जाण्यात स्वारस्य नसतो.
A-I-D-A
चाणाक्ष विक्रेते, जाहिरातकर्ते (advertising एजेंसी) या पिढ्यांचा अत्यंत खोलात जाऊन अभ्यास करतात आणि आपले उत्पाद, त्यांचे प्रस्तावित ग्राहक (टार्गेट कस्टमर सेग्मेंट), त्यांची विभागणी (सेग्मेंटेशन), उत्पादाचे पोझिशनिंग करून त्यांच्या जाहिराती ग्राहकांच्या अवतीभवती अगदी अलगदपणे पेरतात. एकदा पेरणी व्यवस्थित झाली की, उत्पादाची माहिती (Awareness)
वाढते. माहिती वाढली की त्याबद्दल उत्सुकता (Interest) वाढते. मग तो उत्पाद घेण्याची इच्छा निर्माण (Desire) होते. एकदा का एखादी इच्छा तीव्र बळावली की ती माणसाला स्वस्थ बसू देत नाही, त्याचा व्हायचा परिणाम होतो, ग्राहक क्रियान्वत (Action) होतो - दुकानात जाऊन उत्पाद विकत घेतो. उत्पादकाच्या मेहनतीला यश येते.
माहिती-उत्सुकता-इच्छा-क्रिया (AIDA: Awareness-Interest-Desire-Action) चा हा साधासरळ आणि अत्यंत सोपा असा खेळ शेकडो वर्षांपासुन अविरत सुरू आहे. प्रत्येक उत्पादकाला दरवेळी या खेळात यश मिळतेच असे नाही. उलट अपयशाचे प्रमाण जास्त असते, पण बहुतांश वेळा यशाची उंची अपयशाच्या खोलीवर मात करते, आणि हा खेळ सुरू राहतो. यशस्वी होण्याची शक्यता त्याला जास्त आहे, जो या सूत्रांचे तंतोतंत पालन करतो. शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न केला तर दुर्घटना घडली म्हणून समजा. असो.
खेळ नवीन, सूत्र जुने
भारतीय लोकशाहीचा विचार केला तर प्रत्येक मतदाता हा एकापरीने विविध राजकिय पक्षांचा ग्राहकच आहे. त्याला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी राजकिय पक्ष अनेक कार्यक्रम आखत असतात. रोजच्या जीवनातील बाबीपासुन तर त्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांना आपल्या सोबत कसे जोडून ठेवता येईल यासाठी पक्ष धडपडत असतात. कधी कधी यशस्वी होतात. पण खरी पावती मतदानाच्या दिवशी मिळते. निवडणूक जिंकले तर आपले प्रयत्न यशस्वी झाले असे समजून राजकिय पक्ष पुढची पायरी चढतात.
नवीन, चांगला आणि वेगळा..
ग्राहकाला आकर्षित करण्याचे सूत्र जुने जरी असले, तरी या सूत्राचा वापर चलाखीने करायचा असतो. "रिन साबण, आधीपेक्षा जास्त चमकदार" अश्या प्रकारच्या जाहिरातींचे दिवस आता गेले. ग्राहकाच्या जीवनशैलीला पुढे नेण्यासाठी, त्याच्या आकांक्षांना पूर्ण करण्यास तुमचा ब्रांड कसा उपयोगी आहे हे दाखवून, त्यांच्यातील महत्वकांक्षा (aspirational values) जागृत करण्याची किमया ज्याला जमली तो तरला. ह्याच सूत्राला अनुसरून, रिनच्या टीम ने जाहिराती बदलल्या. सायकल चालविणारा मुलगा, त्याला ओवरटेक करणार्या चारचाकीच्या काकाच्या डोळ्यात-डोळा घालून तोऱ्यात म्हणतो, "फर्क सिर्फ दो पहियों का है". असो.
जाहिरात बनविताना तिच्या मधून काय संदेश (मेसेजिंग) द्यायचा आहे, तो कुणाला द्यायचा आहे हे ठरल्यावर तो कसा आणि कधी द्यायचा (डिलीवर), याचा विचार केला जातो. जाहिरातीतील संदेश हा विश्वासार्ह (believable) असायला हवा. रिन, निरमा, व्हील यांच्यासारख्या प्रस्थापित ब्रॅण्ड्सला टक्कर द्यायला उतरताना घडी डिटर्जंट च्या जाहिरातीत सांगितले जायचे "पहले ईस्तेमाल करो, फिर विश्वास करो". उगाच नको ते दावे करायचे टाळले होते. आज घडी डिटर्जंट एक प्रस्थापित ब्रँड आहे.
"चार बूँदों वाला, आया नया उजाला" हे गाणे आजही अनेक मिलेनियल्सला आठवत असेल. टीनोपाल किंवा साध्या निळ पावडरला एक नवीन पर्याय म्हणुन "उजाला" नावाचे लिक्विड बाजारात आणले गेले आणि हातोहात खपले. साध्या सोप्या पद्धतीने आपला संदेश देऊन अगदी तळागाळातील ग्राहकांना आकर्षित केले. टीनोपाल चे पुढे काय झाले माहिती नाही.
"इन्स्टंट" जनरेशन..
नियो मिलेनियल्स म्हणा की जनरेशन झेड म्हणा की जनरेशन अल्फा म्हणा, त्यांच्यात पाहिजे ते मिळवायची जिद्द असते, परंतु त्याच वेळी, क्रिया केल्यावर त्याचा परिणाम लगेच मिळावा (इन्स्टंट ग्रॅटीफिकेशन) अशी त्यांची अपेक्षा असते. मॅगी नूडल्स सारखे इतर इन्स्टंट फुड प्रॉडक्ट्स याच पिढींने उचलून धरले हे विसरता कामा नये.
सांगण्याचा मुद्दा हा आहे की, आपल्याला द्यायचा असलेला संदेश किंवा दावा हा साध्यासोप्या पद्धतीने सांगता तर आलाच पाहिजे, पण त्यात नाविन्य (novelty) असावे लागते, आपला संदेश दुसऱ्यापेक्षा अधिक विश्वासार्ह (believable), चांगला (better) आणि वेगळा (different) करणे गरजेचे असते. संदेश देण्याच्या पद्धतीत (Delivery) सुद्धा "नवीन-चांगला-वेगळा" या सूत्राचा वापर जो चांगला करतो, तो अर्धा खेळ आधीच जिंकतो.
सगळ्यांना जमतेच असे नाही..
बहुतांश राजकीय पक्षांना मतदारांच्या विविध सेग्मेंटची जाण असली तरीही, त्यांचे शेवटच्या स्तरावर विभाजन (सेग्मेंटेशन) करणे जमतेच असे नाही. त्यासाठी प्रचंड डेटा लागतो. कृती प्रत्यक्षात उतरवायला पाहिजे असल्यास विविध संसाधननांची (बौद्धिक, आर्थिक आणि तंत्रज्ञानाची) गरज असते. सगळ्याच राजकिय पक्षांना ते शक्य असते असे नाही.
भाजप, कॉंग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षांकडे स्वतःची अशी व्यवस्था आहे. त्याऊपर ते व्यावसायिक लोकांकडून पाहिजे तेव्हा सेवा घेतात. अर्थात ज्या पक्षांत अशी व्यवस्था नाही त्यांना प्रशांत किशोर सारखे व्यावसायिक सेवारत करून घ्यायची मुभा आहेच. पण काही पक्षांना ते सुद्धा करायला परवडेल असे नाही. थोडक्यात ज्या पक्षाच्या विचारसरणीत, कार्यपद्धती मध्ये उपरोक्त पद्धतीने विचार होत असेल त्या पक्षांना इतरांपेक्षा अधिक मोठे यश, आणि ते वारंवार मिळण्याची शक्यता अधिक असते. असो.
साधारणतः आठ दहा वर्षापूर्वी भाजपने या सूत्रांचा राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात वापर करण्यास सुरू केले, आणि 2014 मध्ये त्यांना अभूतपूर्व यश मिळाले. अर्थात त्याला इतरही अनेक बाबी कारणीभूत आहे. पण भाजपच्या यशामध्ये मिलेनियल्सचा मोठा वाटा होता असे म्हंटले जाते. त्यानंतरच्या निवडणुकांपासून भाजपच्या यशाचे प्रमाण वाढत गेले (कधी कधी कमी सुद्धा झाले), आणि 2019 मध्ये पक्षाने कळस गाठला, त्यांना स्वतःच्या तीनशे तीन जागा जिंकता आल्या.
राजकिय यश हे काही फक्त पक्ष, विचारधारा, नेते, पैसा यांच्यावरच अवलंबून असते असे नाही. कार्यकर्ता कितीही जोशात काम करीत असले तरीही त्यांना चांगला "मल्टीप्लायर इफेक्ट" (गुणाकार) साधायला चांगले संदेशवहन (मेसेज, डिलीवरी) जरूरी ठरते.
आजघडीला भाजप आणि कॉन्ग्रेस याबाबतीत जागरूक दिसतात. काही प्रादेशिक पक्ष अधूनमधून काही राजकिय चाणक्यांची सेवा घेताना दिसतात. पण याचा वापर अजून वाढेल असे वाटते.
नेता वापरी डेटा..
राजकारणी मंडळी हुशार, चाणाक्ष असतात हे जगजाहीर आहे, परंतु सगळ्यांनाच आपल्या मतदाराबद्दल अत्यंत सूक्ष्म स्तरावरील माहिती असेलच असे नाही. काही तर तसा प्रयत्न सुद्धा करीत नाही. तर काही या बदल अत्यंत जागरूक (aware) आणि काटेकोर असतात. या गटात मोडणारे फार कमी नेतेमंडळी आहेत, त्यात सध्याच्या काळात राष्ट्रीय स्तरावर नरेंद मोदी हे एक.
महाराष्ट्राचा विचार केला तर देवेंद्र फडणवीस हे या गटात जाऊ शकतात. कार्यपद्धती, आपल्या टार्गेट सेग्मेंट बद्दलची खडानखड़ा माहिती, त्यांना आपल्याकडे कसे खेचावे याची पुरेपूर जाणीव, त्याच्यासाठी लागणारी ताकत (करिश्मा), पुण्याई म्हणजे त्यांची स्वच्छ प्रतिमा, आणि सकारात्मक ब्रँड इमेज ही सगळ्याच पिढीना त्यांच्याकडे ओढते. मोदींसारखे ते सुद्धा जनरेशन झेड आणि मिलेनियल्स मध्ये अत्यंत "हिट" आहेत, प्रत्येक टार्गेट सेग्मेंट मध्ये त्यांचा "कनेक्ट" जबरदस्त आहे. मुख्य म्हणजे तो बऱ्यापैकी दुहेरी आहे.
महापौर ते मुख्यमंत्री
सतरा वर्षांत..
वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी नागपूर चे महापौरपद भूषवून, नंतरच्या सतरा वर्षांत एवढे प्रगल्भ राजकारण आणि समाजकारण केले की, त्यांना राज्याचे नेतृत्व करायची संधी देण्यात आली, त्याचे त्यांनी सोने केले. 2014 मध्ये कदाचित तीन वर्षे कामगिरी आणि पुढील दोन वर्षे राजकारण करा, या रणनीती ने त्यांना पाठविले असावे. पण त्यांनी दोन्हीही बाबी आपण लीलया पार पाडू शकतो हे तीन वर्षांतच सिद्ध केले.
भारतातच्या नेतृत्त्वात पुढेमागे पीढ़ीबदल होईलच. "जनरेशन एक्स" चे देवेन्द्र फडणवीस एकदिवस "जनरेशन अल्फा" चे नायक बनतील यात शंका नाही. प्रगल्भ होत चाललेली राजकिय बुद्धी, स्वच्छ प्रतिमा, अभ्यासूवृत्ती, कार्यक्षमता, कर्तव्यदक्षता, ओजस्वी वक्तृत्व, आणि स्वच्छ भाषा या गुणांमुळे ते पुढच्या काही काळात - म्हणजे दहा वर्षात, एक राष्ट्रीय लोकनेता म्हणुन प्रस्थापित होतील यात कुणालाच शंका नाही. आपली नाळ मतदाता, जनतेसोबत कायम जोडलेली असायला हवी याची जाणीव त्यांना आहे.
सध्या राज्यात सत्तांतर, आणि देशाची सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आणणे हे त्यांचे ध्येय असावे. राष्ट्रीय नेतृत्वाने सुद्धा त्यांना तसेच मार्गदर्शन केले असावे, अन्यथा त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केले गेले असते. नजीकच्या काळात भाजपच्या बाजुने सत्तांतर झाले तर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनतील यात शंका नाही. जर तसे झाले तर यावेळी मात्र त्यांच्यापुढे अनेक मोठी आवाहने राहतील. आरक्षण, राज्याची आरोग्य व्यवस्था, अर्थव्यवस्था, कायदा सुव्यवस्था, कृषीक्षेत्र, मोठे प्रकल्प आणि उद्योगधंदे यावर त्यांना लक्ष द्यावे लागेल.
असे असले तरीही, गेल्या दीड वर्षात राज्यात सांप्रदायिक आणि जातीय कट्टरता बर्याच प्रमाणात वाढली आहे. त्यावर कणखर उपाययोजना करावी लागेल. देशाला आज भेडसावणारे प्रश्न आहेत त्यात लोकसंख्या नियंत्रण, आणि लव जिहाद महत्वाचे आहेत. ज्या पद्धतीने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात मध्ये याविषयी कणखर भूमिका घेतली गेली थोडीबहुत तशीच भुमिका आपल्या राज्यात सुद्धा अपेक्षित आहे. त्या रूपातील फडणवीस अजुन बघायला मिळाले नाही, त्यामुळे ते बघणे उत्सुकतेचे ठरेल. आणि त्यांची हीच भूमिका त्यांना देशाच्या इतर भागातील (हिंदी बहुल) मतदारांच्या मनात एक कणखर प्रतिमा रोवण्यात निर्णायक ठरेल. आपण सुद्धा राष्ट्रवादाचा आणि हिंदुत्वाचा प्रखर पुरस्कार करतो हे काही प्रमाणात राष्ट्रीय पातळीवर बिंबवतता गेले पाहिजे.
सोनेरी साखळी..
समाजकारण साधण्यासाठी संघटन, संस्था, संघटना, संत समाज, विरोधक, विविध समाज, सहकार, व्यापार आणि माध्यमं ही एक सोनेरी साखळी आहे. समाजकारण करता-करता कधी-कधी राजकारण करावे लागते, आणि शेवटी व्यक्तीचा राजकिय नेता होतो. तळागाळातील सगळ्यांकडून ज्याला मान्यता मिळते त्या राजकिय नेत्याचा लोकनेता होतो. म्हणजे थोडक्यात, ज्यांचा या सोनेरी साखळीच्या जेवढ्या जास्तीत जास्त कड्या (लिंक्स) मध्ये स्वतःचा (व्यक्तिशः) वावर असेल, तेवढी त्यांची वाटचाल कमी खडतर होते, अधिक यशस्वी होते.
मागील दीड वर्षांत फडणवीसांनी या सोनेरी साखळीतील अनेक घटकांमध्ये स्वतःचा (व्यक्तिशः) वावर / "आउटरिच" वाढवला, काही ठिकाणी प्रासंगिक तर काही ठरवून. त्यामुळे त्यांचा नेटवर्क अजून वाढला. आता ह्या वाढलेल्या नेटवर्कला ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतरही बर्यापैकी उपलब्ध राहतील अशी अपेक्षा राहिली तर ते साहजिकच आहे. पहिल्या टर्म मध्ये काही कुजबुज यायची की त्यांची उपलब्धता फार मोजक्याच मंडळीना होती, किंवा त्यांची उपलब्धता मिळण्यासाठी ठराविक मंडळीना साकडे घालावे लागायचे. सामान्य नागरिकांसोबतचा त्यांचा संवाद पहिल्या टर्म मध्येही चांगलाच होता. कोरोना काळात तो अधिक चांगला झाला असावा.
जाता जाता..
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आणि सध्याचे विरोधीपक्षनेते श्री देवेन्द्र फडणवीस उद्या (22 जुलै) त्यांच्या आयुष्यातील बावन्नाव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. जवळपास तीस वर्षांचा सक्रिय राजकिय अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. सकारात्मक राजकारण करून ते राज्यात आणि पश्चिम भारतात प्रस्थापित झालेच आहेत, बिहार मधील निवडणुकांमध्ये त्यांनी आपल्या बुद्धी कौशल्याने राष्ट्रीयपातळीवर सुद्धा चांगलीच छाप सोडली. कदाचित त्यांना पश्चिम बंगालमधील निवडणुकांमध्ये अधिक सक्रिय पद्धतीने गुंतविले जाऊ शकले असते का असे वाटते. हे म्हणजे, जो फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या पर्थ मैदानावरील उसळणार्या पीचवर शतक ठोकतो, तो जायबंदी नसताना सुद्धा सिडनी मधील मॅच मध्ये बाहेर बसतो. अनाकलनीय आहे. असो.
"जनरेशन अल्फा" देवेंद्र फडणवीस यांना आपल्या बालवयापासून बघत आहेत. येणार्या काळात त्यांच्या सोबत सुद्धा राजकीय "नाळ" जोडली जाईल यात शंका नाही. 2030 मध्ये देवेंद्र फडणवीस साठ वर्षांचे होतील आणि "जनरेशन अल्फा" होईल वीस वर्षांची. बहुतकरून त्याकाळात ते राष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित होऊन देशाचे नेतृत्व म्हणुन उभारले गेले असतिल. "जनरेशन अल्फा" च्या मतदातारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी "कल आज और कल" (1971) या सिनेमातील हे गीत त्यांच्यासाठी अगदी समर्पक वाटते.
बोलो प्रीत निभाओगी ना, तब भी अपने बचपन की".
महाराष्ट्रातील तरुणाईला आपल्या कार्यपद्धतीने आणि कार्यक्षमतेने गारूड घालणार्या आजच्या काळातील स्वच्छ प्रतिमा असलेले लोकनेते देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या कारकिर्दीत भारत विश्वगुरु म्हणुन अजुन भक्कमपणे प्रस्थापित होईल अशी आशा करूया.
शुभम भवतु.
- धनंजय मधुकर देशमुख, मुंबई
(स्तंभलेखक एक स्वतंत्र मार्केट रिसर्च विश्लेषक आहे. पोस्टमधील माहिती, आकडेवारी, कविता, फोटो इंटरनेट वरुन साभार घेतले आहे.)
विश्लेषणात्मक माहिती आणि राजकारण यांची उत्तम सांगड घालून लिहिलेला लेख.
ReplyDeleteसाधारणपणे आपल्या विवेचनाप्रमाणे जेन एक्स मधले जे लोक आहेत त्यांची मुलं मिलेनियल्स आहेत.
जेन एक्स च्या काळात ढोबळ मानाने समाजाची एक सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती होती, ज्याला आपण कनिष्ठ मध्यमवर्ग म्हणू, त्यामुळे त्या काळात ब-याच गोष्टी करायच्या राहून गेल्या असे बरेच जण असतील. मोठे किंवा संयुक्त कुटूंब असणं हे पण एक कारण होतं. नंतरच्या काळात कष्टाने, मेहनतीने जेन एक्स उच्च मध्यमवर्गापर्यंत जाऊन पोहचला.
मिलेनियल्स च्या काळात कुटूंब संकुचित झाली आहेत. त्यामुळे त्यांना हवं ते मिळतंच किंवा ते मिळवतातच अशी परिस्थिती आहे.
माझा प्रश्न हा आहे कीं जेन एक्स मंडळी असा विचार करते कीं मला जे कष्ट पडले, जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलांना मी देऊ शकतो तर कां देवू नये, ही वृत्ती वाढीस लागली आहे कां?
होय. जन झेड, वाय, अल्फा यांच्या दुसर्या पिढी च्या तुलनेत विचार करण्याच्या पद्धतीत फरक आहे. आणि आपण म्हणता ते बरोबर आहे
ReplyDeleteजन एक्स किंवा त्याआधीच्या पिढी मध्ये ही भावना आहे, आपल्या मुलांना चांगले शिक्षण, फिरण्याच्या संधी मिळाव्यात. फक्त राजकारण विषयी ते विचार करत नाही की आपण ज्यांना मत देतोय ते पुढच्या पिढी साठी नीट विचार करतील का. धन्यवाद सारंग जी 🙏
विवेचन आवश्यकतेनुसार विस्तृत आहे. फडणवीस यांच्या बद्दल माहिती मिळाली.
ReplyDeleteया विषयाप्रमाणे youtube वर श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी जी यांचा beware of charisma वर एक बौद्धिक आहे. सोबत लिंक दिली आहे. आपल्या लेखामुळे केवळ याची आठवण आली एवढंच प्रयोजन.
आपण लिहीते रहाल आणि शहाणे करुन सोडावे सकलजन 🙏
https://youtu.be/N13IDMHs67Y
नमस्कार, आपल्या वेळेबद्दल आणि अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आ श्री दत्तोपंत ठेंगडी यांचे बौद्धिक ग्रहण केले. त्यांनी जे दोन प्रकार सांगितले, माझ्या मते फडणवीस हे पहिल्या प्रकारात मोडतात, character etching. दुसरे, आपण नाकारले तरीही त्यांचा एक करिश्मा आहे. तो कमी जास्त होत राहील, पण तो नेहमी अधिक राहावा त्यासाठी धडपड करतांना फारसे आढळत नाही. आधी, आणि महाराष्ट्रासारख्या मोठ्या, अग्रेसर राज्याचे मुख्यमंत्री असतानाच्या पाच वर्षांत त्यांनी आपली क्षमता - बौद्धिक, राजकीय आणि तांत्रिक ही बर्यापैकी दाखवली. राज्यात दुसरे पर्याय नव्हते म्हणुन त्यांना पाच वर्षे टिकू दिले असे वाटत नाही. त्यांच्या कर्तृत्वाने ते टिकले. त्यांना श्रद्धेय ठेंगडी यांचे बौद्धिक मार्गदर्शन लाभले असेलच, तेव्हा ते, आपले प्रतिमा भंजन करत राहून तिच्या दुहेरी जाळ्यात फसतील असे म्हणणे कदाचित योग्य राहणार नाही. ते सुद्धा सजग असतिल. येणारा काळ दाखवेल ते किती कणखर, सक्षम आहेत ते. पण राज्याला ज्या सक्षम नेतृत्वाची गरज आहे त्याला ते नक्कीच पात्र आहेत.
Deleteआपल्या माहितीसाठी पुन्हा एकदा धन्यवाद 🙏🚩