Skip to main content

Posts

वीर-गाथा: ईशान्य भारताचे वीर लचित बोरफुकन

२४ नोव्हेंबर २०२२  वीर-गाथा: ईशान्य भारताचे   वीर लचित बोरफुकन   आज २४ नोव्हेंबर म्हणजेच “लचित दिवस"-अहोम सैन्याचे कमांडर आणि आसामी राष्ट्रवादाचे प्रतीक श्री लचित बोरफुकन यांची ४००वी जन्मजयंती. (अहोम साम्राज्याने आसामला सुमारे ६५० वर्षे स्वतंत्र ठेवले. अहोमांनी खिलजीपासून औरंगजेबापर्यंत सर्वांचा पराभव केला).   काल पासून नवी दिल्लीतील विज्ञान भवनात दोन दिवसीय कार्यक्रम सुरु आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहिलेत, या प्रसंगी आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आणि प्रदर्शनाचे आयोजन केले गेले.   आज २४ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी लचित बोरफुकनवरील एक पुस्तक राष्ट्राला समर्पित करतील. लचित बोरफुकन यांच्या जीवनावर आधारित माहितीपटाच्या स्क्रीनिंगचे उद्घाटन गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. हा चित्रपट नंतर अनेक प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखवला जाईल.   काही महिन्यांपूर्वी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी इतर राज्यांतील त्यांच्या समकक्षांना पत्र लिहून त्यांच्य...

अमरावती बनतेय का राजकीय प्रयोगशाळा?

२० नोव्हेंबर २०२२ अमरावती बनतेय का राजकीय प्रयोगशाळा? - धनंजय देशमुख, मुंबई अमरावती (प्राचीन इन्द्रपुरी) जवळपास सात-आठ लाख लोकसंख्या असलेले पश्चिम विदर्भातील एक मोठे शहर. मागच्या आठवड्यात अमरावती आणि बडनेरा येथे चार वर्षांच्या कालावधी नंतर जाणे झाले. ह्या खेपेला फारसे फिरणे झाले नसले तरीही काही बदल नजरेत बसले. नागपूरहून अमरावतीला येतांना रहाटगांव नाक्यावर आता कपड्यांची भरपूर मोठमोठी दुकाने /मॉल झाली आहेत, ज्यामुळे बरीच लोक इकडे खरेदीसाठी येतात. हे मार्केट पूर्णपणे नव्या पद्धतीने वसवलेले आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. कदाचित शहरातील मूळ कपड़ा मार्केट कधी काळी (50-70 वर्षांपूर्वी) असेल वसवलेले असेल. त्याचप्रमाणे या भागात अनेक मोठी मंगल कार्यालये उभी राहिली आहेत. कपड़ा मार्केट आणि मंगल कार्यालय झाल्याने हा भाग आता शहरातील वाटतो, कारण वर्दळ वाढलेली आहे. दूसरी लक्षणीय बाब म्हणजे शहरातील सिमेंटचे रस्ते - गाडगेनगर ते बडनेरा येथपर्यंत. त्यामुळे वाहतुकीला गती प्राप्त झालेली दिसते. शहरातील शिक्षण संस्था प्रगत असल्याने अनेक व्यक्ति परदेशी किंवा पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरात चांगल्या प्र...