28 मार्च
2021, मुंबई
"बॉडीलाइन"
इज़
नॉट
फाइन..
कुठल्याही
राज्यातील
राजकीय
पटलावर
एकाच
वेळी
अनेक
गोष्टी
घडत
असतात,
त्यातल्या
त्यात
महाराष्ट्रात
तर
गेल्या
चार
आठवडय़ात
बर्याच
घडामोडी
घडल्यात.
अधिवेशन,
एका
मंत्र्याचा
राजीनामा,
वीस
जिलेटीन
कांड्या
असलेली
जीप,
एका
व्यावसायिकाचा
संशयित
पद्धतीने
खून,
एका
जुन्या
आणि
भरोशातील
पोलीस
अधिकाऱ्याला
अटक,
आणि
इतर बर्याच घटना.
दर
वेळेस
काहीसा
आभास
तयार
होतो
किंवा
केला
जातो
की
तीन
पक्षीय
सरकार
पडते
की
काय.या
सगळ्या
पार्श्वभुमीतून
वेळकाढून
राज्यातील
नेते
कार्यक्रम
घेत
आहेत.
अश्याच
एका
क्रिकेटच्या
टूर्नामेंटला
विरोधीपक्ष
नेते
आणि
माजी
मुख्यमंत्री
यांनी
हजेरी
लावली,
काही
वेळ
खेळले
आणि
नेहमीप्रमाणे
टोलेबाजी
केली.
ते
म्हणाले
मी
सध्या
बॅटिंग
करतोय
कारण दुसर्या बाजूने
फुल
टॉस
मिळत
आहेत.
आपण
गोलंदाजी
पण
करणार,
गुगली,
पण
टाकणार
पण
"बॉडीलाइन
" नाही
करणार.
क्रिकेटमध्ये,
गोलंदाजांचा
स्टंप
वर
मारा
करण्याचा
भर
असतो,
पण
जेव्हा
पट्टीचा
फलंदाज
येतो,
टिकतो
तेव्हा
मग
ते
स्टंपसोडून
मारा
करतात,
विशेषतः
वेगवान
गोलंदाज.
मग
कधी
उजव्या
स्टंप
बाहेर
किंवा
डाव्या
(लेग)
स्टंपला
धरून.
लेग
स्टंपवर मारा
करताना
ते
फलंदाजाच्या
जवळ
लेग
साइड
चार
पाच
खेळाडू
उभे
करतात.
विचार
हा
असतो
की,
फलंदाजाच्या
कमरेवरून
चेंडू
जोरात
जायला
हवा
जेणेकरून
तो
सोडायच्या
नादात
त्याचा
हाताला
किंवा
बॅट
ला
स्पर्श
करून
चेंडू
उडेल
आणि
खेळाडू
कॅच
घेईल.
समजा
नाही
लागला
तर
शरीराला
चेंडू
लागेल
ज्यामुळे
फलंदाज
विचलित
होईल.
1932-33 च्या
ऑस्ट्रेलिया
मधील
अॅशेस
दौऱ्यात
इंग्लंड
टीमकडून
ही
खेळी
खेळली
गेली.
डगलस
जार्डीनच्या
नेतृत्वाखाली
गेलेल्या
इंग्लिश
टीमला
आव्हान
होते
ऑस्ट्रेलियाच्या
खंद्या
फलंदाज
डॉन
ब्रॅडमन
आणि
त्यांच्या
सहकाऱ्यांचे.
हॅराल्ड
लारवूड
या
इंग्लंडच्या
वेगवान
गोलंदाजआणि
त्यांच्या
सहकार्यांनी,
डॉन
ब्रॅडमन
यांच्या
जुन्या
खेळीचे
फुटेज
बघितले
आणि
त्यात
त्यांना
असे
आढळले
की
ब्रॅडमन
हे
लेग-स्टंप
वरील
उसळत्या
चेंडूला
नीटसे
सामोरे
जात
नाही.
तिथेच
ठरले
त्यांचे.
त्या
मालिकेत
प्रत्येकवेळी
त्यांनी
ब्रॅडमन
आणि
ऑस्ट्रेलियाच्या
इतर
मुख्य
फलंदाजांवर
वेगवान,
आखूड
अन
उसळत्या
चेंडूंचा
मारा
केला.
त्याचा
परिणाम
व्हायचा
तो
झाला,
इंग्लंड ने
मालिका
4-1 ने
जिंकली,
99 रन
एवढी
सरासरी
असणार्या
डॉन
ब्रॅडमन
यांची
या
मालिकेतील
सरासरी
फक्त
56 रन्स
एवढीच
होती.
कालांतराने
बॉडीलाइन
गोलंदाजी
वर
अलिखित
बंदी
आली.
पण,
सत्तरीच्या
दशकात
ऑस्ट्रेलियाने
वेस्टइंडिज
सोबत
अशीच
रणनीती
अवलंबिली
होती,
क्लाइव
लॉयड,
हेन्स,
रिचर्डस,
मरे,
ग्रीनिज
असे
खंदे
फलंदाज
असताना
सुद्धा,
डेनिस
लिली
आणि
जेफ
थॉमसन
यांनी
वेस्टइंडिजच्या
फलंदाजांना
आपल्या
आखूड
आणि
वेगवान
गोलंदाजी
ने
सळो-की
-पळो
करून
सोडले,
बलाढ्य
विंडीज
ती
मालिका
5-1 ने
हरली.
पण
लॉयड
यांनी
हार
नाही
मानली.
त्यांनी
माय
देशी
परतल्यावर
होल्डिंग,
रॉबर्ट्स,
गार्नर,
क्राफ्ट
यांस
सोबतीला
घेऊन
वेगवान
गोलंदाजांची
फौज
तयार
केली.
या
"पेस
बॅटरी"
च्या
बळावर
विंडीज
ने
पुढे
भारत,
इंग्लंड
आणि
ऑस्ट्रेलियाला
अनेक
वेळा
मात
दिली.
या
विषयावर
"फायर
इन
बेबीलॉन"
नावाचा
एक
अत्यंत
वास्तविक
पद्धतीने
लघुपट
सुद्धा
बनविलेला
आहे.
थोडक्यात
काय,
आपण
कुठली
रणनीती
आखतो
यावरच
सारे
अवलंबून
असते.
ती
अनैतिक
असली
तरी
तिचा
वापर
करावा
की
नाही
हा
त्या-त्या
वेळचा
सेनापती
ठरवितो.
असो.
फडणवीस
यांनी
"बॉडीलाइन"
करणार
नाही
हा
निर्णय
नैतिकतेला
धरून
घेतलेला
असावा.
महाराष्ट्राच्या
ह्या
राजकीय
पीच
भाजप
विरुद्ध
तीन
पक्ष
असा
डाव
रंगलाय.
भाजपचे
राज्यातील
नेतृत्व,
देवेंद्र
फडणवीस
कधी
फ्रंटफुट
वर
जोरदार
फटके
मारताहेत,
तर
कधी
आपल्या
जोरकस
गोलंदाजीने
तिन्ही
पक्षांना
बॅक
फुट
वर
जायला
मजबूर
करताहेत. कधीकधी गळा धरणारे बाऊन्सर तर मध्येच गुगली
टाकून आपल्या विरोधकांना आणि
मीडियाला
सुद्धा
संभ्रमित
करताहेत. आपण
"बॉडीलाइन"
गोलंदाजी
करणार
नाही
असे
फडणवीस
यांनी
जाहीर
केल्यामुळे
विरोधी
तंबूतील
बर्याच
फलंदाजांनी
उसासा
सोडला
असावा.
फडणवीस
यांच्यावर
मात्र
अनेकदा
"बॉडीलाइन"
चा
प्रयोग
त्यांच्या
विरोधकांनी
केलेला
आहे,
मग
ते
आतले,
असोवा
बाहेरचे!
असो.
आला होळीचा सण..
हुताशनी
पौर्णिमा,
म्हणजे
होळीला
सूर्य
विषुववृत्तावर
येतो
असे
म्हणतात,
त्यामुळे
वातावरण
तापते.
काल
मुंबईतील
तापमान
जवळपास
40 अंश
सेल्सियस
एवढे
होते.
गुजरात
मधील
तापमान
कदाचित
कमी
असेल,
म्हणुन
च
राज्यातील
काही
वरिष्ठ
नेतेमंडळी
हवा-पालटेला
तिकडे
गेले
असावेत
(अर्थात
त्यांना
वाटले
तर,
हवा
पालटायला
पण
जाऊ
शकतात),
आणि
तिथे
भाजपच्या
वरिष्ठ
नेत्यांसोबत
"योगायोगाने"
हवा-पाण्याच्या
गप्पा
झाल्या
असाव्यात.
येणार्या
काळात
कळेल
च
की
हवा
"पलटली"
की
नाही.
तूर्तास
जिलेटीन
कारच्या
प्रकरणात
चौकशी
सुरू
आहे.
मुंबईच्या
खाड्या-नद्या
मध्ये
मृतदेह,
लॅपटॉप,
डीवीआर,
कॉम्प्युटर
अश्या
गोष्टी
सापडत
आहेत.
जाता
जाता..
लहानपणी
एक
गोष्ट
वाचली
होती.
एका
साधकाच्या
साधनेवर
प्रसन्न
होऊन,एक
ऋषी
त्याला
वर
देतो
- तो
दिवसभरात
जेव्हढे
चालेल
तेवढी
जमीन
त्याला
मिळेल,
अट
मात्र
एवढीच
की
सूर्यास्ताच्या
वेळेला
त्याने
जिथून
सुरवात
केली
तिथे
परत
यावे.
तो
धाव-धाव
धावतो,
खूप
लांब
जातो,
थकतो,
तरीही
हव्यासापोटी
धावतो.
विसरून
जातो
की
आपण
बरेच
लांब
आलो
आहे,
शेवटी
घरी
परतायचा
प्रयत्न
करतो
मात्र
तोपर्यंत
सूर्यास्त
झालेला
असतो.
त्याला
काहीच
मिळत
नाही,
उलट
अतिश्रमामुळे
तो
थकतो,
आजारी
पडतो.
महाराष्ट्रात
सुद्धा
असेच
काहीसे
चित्र
दिसतेय.
साठ
महिन्यांचा
प्रवास
सुरू
तर
झाला,
मात्र
पंधराव्या
महिन्यातच
कुरबुरी
सुरू
झाल्या,
मुंबई
मधील
बार
मालकांकडून
दरमहा
शंभर
कोटी
खंडणी
वसूली
करून
घ्यावा
असा
गंभीर
आरोप
वरिष्ठ
मंत्र्यांवर
एका
पोलीस
अधिकार्याकडून
झाला
आहे,
6.3 जीबी
च्या
रेकॉर्डिंग
मधून
कदाचित
अनेक
प्रकरणे
बाहेर
येऊ
शकतात,
किंबहुना
अत्यंत
गंभीर.
अर्थात
कुणीच
साठ
महिन्यांचा
विचार
केला
नसेल,
संख्याबळ
कितीही
मजबूत
असले
तरीही.
परंतु
जिथे
पंधरा
वर्षांच्या
आणाभाका
घेतल्या
गेल्या
होत्या,
तिथे
पंधरा-अठरा
महिने
हा
कालावधी
कमीच
नाही
का?
कधी-कधी
आपल्याला
असे
जाणवते
की
परतीचा
प्रवास
लवकर
झाला.
जिना
चढताना
जेवढा
वेळ
लागतो
त्यापेक्षा
उतरताना
कमी
लागतो
असे
अनेकदा
होते.
राज्यातील
राजकिय
पटलावर
सुद्धा
असेच
काहीसे
होताना
दिसतेय.
आधी
व्यक्तिगत
आरोप,
मग
पक्षीय
आरोप,
नंतर
अबोला
आणि
मग
शेवटी
राजकीय
वितुष्ट.
निदान
पुढच्या
राजकीय
फायद्यासाठी
पुन्हा
गोळा
होण्यापर्यत
तरी.अर्थात,
या
सगळ्या
खेळात
कुणाचे
घर-आंगण
अबाधित
राहते,
कुणाच्या
परतीचे
दोर
कोण
कापतो
हे
येणार्या
दिवसात
दिसेलच.
तोपर्यंत
आपण
वाट
बघुया.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते, देवेंद्र फडणवीस यांनी ते "बॉडीलाइन" गोलंदाजी करणार नाही हे जरी घोषित केले असले तरीही दीडशे किमीच्या गतीने आत येणारे यॉर्कर ते नक्कीच फेकू शकतात. बघुया, कुणी त्रिफळाचीत होतात का!
तूर्तास
एवढेच.
- धनंजय मधुकर देशमुख, मुंबई
(लेखक, स्वतंत्र मार्केट रिसर्च विश्लेषक आहे. पोस्टमधील माहिती, आकडेवारी, कविता, फोटो इंटरनेट वरुन साभार घेतले आहे.)
Comments
Post a Comment