21 मार्च 2021, मुंबई
रमूया थोड़े रमीत...
बर्याच दिवसांनी आज रमीचा डाव
खेळलो.
दहा
पत्त्याची, 3-3-4, आणि जोकर
नसलेली
रमी!
(जोकर
असलेली
रमी
खेळणे
म्हणजे
मिळमिळीत मिसळ
खाणे,
काय
असते
मजा
तिला?).
पहिल्याच डावात
मात्र
गम्मत
झाली,
दोन-
दोनच्या पाच
जोड्या
लागून
आल्या,
मग
झाली
ना
फजिती!
कुठला
पत्ता
सोडावा
आणि
कुठला
ठेवावा
यात
गल्लत
होत
गेली. सामान्य माणसाला दरवेळेस दोन पैकी नेमका
कुठला
पत्ता
टाकावा
याचे
जजमेंट
दरवेळेस जमेलच
असे
नाही.
अनेकदा
आपण
फेकलेल्या पत्त्याच्या जोडीचेच पत्ते,
नेमके
तो
पत्ता
आपण
फेकल्यावर आपल्या
समोर
येतात!
नंतर विचार केला
तर
असे
आढळते
की,
रमीमध्ये, सुरुवातीलाच आपल्याला सोडता
येणारी
काही
पत्ते
येणे
बर्याचदा फायद्याचे सुद्धा
असते.
दहापैकी 6-7 आसपास
जुळलेली आणि
2-3 सोडण्यासाठी किंवा
जमले
तर
जमले
या
कॅटेगरी मधील!!त्यामुळे खेळणाऱ्याला सोपे जाते. अर्थात,
काहींना ही
विचारसरणी नकारात्मक वाटू
शकते,असो.
राजकारणात पण रमीप्रमाणे, खेळता-खेळता जोड्या लागल्या तर
खेळ
छान
जमतो.
जोड्या
आधीच
लागून
आल्या
की
मग
कधी-कधी कठीण होऊ
शकते.
आता
राज्यातील राजकिय
परिस्थितीच बघा.
2019 जेव्हा
सत्तास्थापनेचा कार्यक्रम सुरू
होता,
त्यावेळी तिन्ही
पक्षांना आपापल्या मोठ्या
अनुभवी
नेत्यांना मंत्रिमंडळात सामील
करण्याची संधी
होती. कॉन्ग्रेसला तश्याच कमी जागा
मिळाल्या, तरीही
पक्षाने बहुतांश अनुभवी
लोकांना संधी
दिली,
काही
दोन
तीन
मोठे
चेहरे
सोडले
तर.राष्ट्रवादीने
सुद्धा
जवळपास
सगळ्याच मोठ्या
नेत्यांना संधी
दिली.
मात्र
शिवसेनेने तसे
नाही
केले,
अनेक
जुन्या,
अनुभवी
आणि
प्रस्थापित नेत्यांना मंत्रिमंडळात संधी
मिळाली
नाही.
तीन-चार
नेते
वगळला,
त्या तुलनेत सेनेचे
बरेच
मंत्री
नवीन
आहेत.
जुन्या लागलेल्या जोड्या
घ्यायचे सेनेने
टाळले
असावे
का
की
हा
निव्वळ
योगायोग असावा
हे
तेच
सांगू
शकतात.
पण
जर
समजून
केले
असेल
तर,
याचे
कारण
तीन
पक्षांचे सरकार
आहे
म्हणुन
असावे.
आत्ताची परिस्थिती बघता
असा
प्रश्न
पडतो
की,
हा
कदाचित
त्यांच्या रणनीतीचा भाग
असावा
का? असेलही किंबहुना नसेलही. असेल तर, हा विचार स्वयंभू आहे कि कुणी सल्ला दिला - हे ज्याचे त्यालाच ठाव
एकेमकांना अनुकूल नसणारी विचारधारा, आंतरिक समन्वयाचा अभावामुळे किंवा,
कॉंग्रेस आणि
राष्ट्रवादीच्या पारंपरिक प्रतिष्ठेच्या संघर्षात, येणार्या कालखंडात आपल्याला काही
बळी
द्यावे
लागतील
तेव्हा
सगळेच
नेते
अनुभवी
आणि
जुने
असण्यापेक्षा, त्यातल्या त्यात
नवीन,
अननुभवी नेते
असलेले
कधीही
बरे.
या
महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अधिवेशनात शिवसेनेला आपल्या
एका
मंत्र्याचा राजीनामा घ्यावा
लागला.
मंत्री
तसे
एकदम
नवीन
पण
नव्हते,
पण
सेनेच्या टॉप-लाइन मधले सुद्धा
नव्हते,
हेही
तितकेच
खरे.
मात्र राष्ट्रवादीवर एकदा
ही
वेळ
आली
होती,
त्यातून त्यांची कोंडी
वेळेवर
सुटली.
मात्र
आता
पुन्हा
परिस्थिती निर्माण होतेय,
कारण
विरोधी
पक्ष
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
करीत
आहे.
पक्ष
नेतृत्वापुढे पेच
निर्माण झाला
असेलच,
कारण
मंत्री
तसे
ज्येष्ठ आणि
आतल्या
गोटातील आहे.
शेवटी काय, हलके
होण्याची वेळ
येते
तेव्हा
मोठा
पत्ता
टाकायला लागणे,
यापेक्षा मोठी
वाईट
परिस्तिथी एखाद्या खेळाडूवर आली
तर
काय
होते
हे
कळते.
राजकिय
रमी
काय,
आणि
पत्त्याची रमी
काय
- नियम,
रणनीति
सारखेच
असतात!
बघुया,
राजकिय
पटलावर
जोड्या
पुन्हा
जमतात
का,
की
जमलेला
डाव
फुटतो?
जाता जाता..
राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती अस्थिरतेच्या अजून
किती
जवळ
जाते
हे
येत्या
आठवड्यात स्पष्ट
होईलच.
पत्त्यांच्या डावासारखा हा
डाव
रंगतो,
की
पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे सत्तेचे घर
कोलमडून पडते
हे
स्पष्ट
होईलच.
किंवा सर्कशीतील शेवटचा
आणि
महत्वाचा असणारा
हवेतील
शीडीच्या खेळात,
कधी
कधी
एखाद्या खेळाडूचे शीडी
पकडण्याचे गणित
चूकते
ताशी
काहीशी
परिस्थिति निर्माण होते
का?
आणि
तशी
झालीच,
तर
खाली
लावलेले जाळे
मजबूत
आहे
का,
हे
बघणे
औत्सुक्याचे ठरेल.
सत्तेचा
अमरपट्टा कुणालाच मिळत नाही हे मात्र खरे.
एका मराठी ब्लॉग
मध्ये
श्री
भाऊसाहेब पाटणकर
यांची
"पत्त्यांचा खेळ"
ही
कविता
वाचनात
आली,
त्यातल्या काही
ओळी
-
“मारतो राजास एक्का, नहिल्यास दहीला मारतो
कल्पनेचे खेळ सारे, कोणी कुणा ना मारतो
पाहता कोणात काही नाही कुठेही वेगळे
सारेच तुकडे कागदाचे, छाप नुसते वेगळे
आता जरासा रंग काही खेळास येऊ लागला
पत्यातला राजा स्वतःला राजाच मानू लागला
राणीसही जाणिव काही और होऊ लागली
लाजलि नव्हती कधी ती आज लाजू लागली".
तूर्तास एवढेच.
कालाय तस्मै नमः
- धनंजय मधुकर देशमुख, मुंबई
(लेखक, स्वतंत्र मार्केट रिसर्च विश्लेषक आहे. पोस्टमधील माहिती, आकडेवारी, कविता, फोटो इंटरनेट वरुन साभार घेतले आहे.)
खर आहे
ReplyDelete🙏
Delete