20 नोव्हेंबर 2019
सत्य घटनेवर / स्वानुभवावर आधारित
1. परतलेले पॅनकार्ड
मागच्या आठवड्यात काही कामानिमित्त बॅंकेत गेलो होतो. तिथे लागेल म्हणुन पॅनकार्ड वर ठेवला होता. घरी परतलो तर पॅनकार्ड सापडेना. बॅंकेत फोन केला, त्यांनी प्रामाणिकपणे धुंडाळले परंतु "नाही" असे उत्तर मिळाले. आपले पॅनकार्ड हरवले आहे हे पक्के समजून, पुढील बाबींसाठी मी माझ्या आर्थिक सल्लागाराशी संपर्क साधला.
"पोलिसात एक साधी तक्रार नोंदवून आपण डुप्लिकेट पॅनकार्डसाठी अर्ज करूया, दोन आठवड्यात नवीन कार्ड येईल, ते सुद्धा होलोग्राम असलेले, (म्हणजे चांगले)" असे माझ्या मित्राने सांगितले.
ह्या सगळ्या सोपस्कारांमध्ये पाउण तास गेला. डुप्लिकेट कार्ड साठी अर्ज करू या विचारात होतो तेवढ्यात लॉबी मधुन फोन आला की एक रिक्षाचालक पॅनकार्ड देऊन गेले आहेत. व्वा क्या बात है. थोड्याच वेळात माझे "तथाकथित हरवलेले" पॅनकार्ड मला परत मिळाले.
रिक्षाचालक मात्र माझे पॅनकार्ड गेटवरील माणसाला देऊन निघून गेले होते त्यामुळे त्यांना भेटता आले नाही. त्यांना धन्यवाद सुद्धा देता नाही आले. खरेतर जवळपास अर्ध्या तासात ते किती पुढे गेले असतिल, तरी सुद्धा त्यांनी ते परत आणून दिले. ज्याचे हरवले तो कुठल्या मनस्थितीत असेल ह्याचा विचार त्यांनी नक्की केला असावा. आणि परतले.
माणुसकीवर आणि माणसाच्या सद्सद्विवेकबुद्धी वरील विश्वास वाढला. असो.
2. "माझ्या मामाचे पत्र हारवले.. तेच आम्हाला सापडले "
पॅनकार्ड प्रकरणाचा विचार करताना
लहानपणी शाळेत असतांनाचा खेळ आठवला. आठ दहा मुले एका वर्तुळाकार रचनेत बसायचे. त्यांच्या मागून एक मुलगा फिरायचा. तो फिरत असताना बसलेले मुलं एकमेकांना मध्ये रुमालाचा एक बोळा मागे फिरणार्या मुलाला दिसणार नाही असे फिरवायचे. मागचा मुलगा "माझ्या मामाचे पत्र हारवले", बाकीचे म्हणायचे "तेच आम्हाला सापडले".
मात्र ते पत्र (रुमालाचा बोळा) काही लगेच नाही सापडायचा. शोधावा लागायचा. लपवणार्यांचे आणि धुंडाळाणार्याचे, दोघांचेही कसब पणाला लागायचे. थोडीफार गुद्दागुद्दी सुद्धा व्हायची. खेळ मात्र बराच वेळ चालायचा. आनंद लुटला जायचा.
3. मुंबईतील पत्र सापडेल का?
या दोन्ही गोष्टींचा विचार सुरू असतांना असे आढळले की महाराष्ट्रातसुद्धा असाच एक खेळ रंगलाय.
दोन मित्र, जिवाभावाच्या आणाभाका घेऊन, युती करून सोबत निवडणुका लढले. युतीला निर्भेळ, निर्विवाद बहुमत सुद्धा मिळाले.
मात्र ज्या दिवसापासुन निकाल जाहीर झाला त्या दिवसापासुन यातील एका मित्राचे "ते पत्र (सोबत येण्याचे)" हरवले. कुठे हरवले. कुणाकडे आहे हे दिसत असले तरी ते पत्र काही परत मिळत नाहिये.
बरे या खेळात जो पत्र शोधतोय तो काही गुद्दागुद्दी करीत नाहिये. परन्तु ज्या कळपात हे पत्र हरवलेले आहे त्या कळपामध्ये कबड्डी, कुस्ती, खो खो, क्रिकेट, या खेळांना खेळवणारे रथी-महारथी आहेत. त्यामुळे ते पत्र रमलेले दिसतेय सध्यातरी.
खेळ आनंदाने सुरू आहे, अहोरात्र. मात्र तो कधी ना कधी संपणारच. खेळच तो शेवटी. कबड्डी, कुस्ती, खो खो, क्रिकेट, या खेळांना खेळवणारे रथी-महारथी हसत खिदळत जातील घरी आपापल्या.
मात्र त्या पत्राचे काय? कुस्करलेल्या कागदाच्या बोळा सारखं त्याची अवस्था होईल. उघडल्यावर काही वाचता येणार नाही.
समजा माझ्या मित्राला ते पत्र आता परत मिळाले तरी ते कुस्करलेले पत्र त्याच्या किती कामी येणार? अर्थात मित्र माझा मोठा कसबी आहे, तो चालवूनही घेईल. पत्राची पत मात्र कमी झाली असेल.
जर काही योग जुळले तर एखाद्या वेळेस "माझ्या मामाचे पत्र हरवले" म्हणणार्या माझ्या मित्राला दुसरेच नवीन कोरे करकरीत पत्र मिळेल, ते सुद्धा एखाद्या नव्या मामा / काका कडून. अर्थात त्यात सदसद्विवेकबुद्धी किती असेल ते सांगता नाही येणार.
मात्र त्या कुस्करलेल्या बोळ्याचे काय? जाऊ दे. आपण कशाला विचार करायचा!
आपला मित्र नवीन कोर्या करकरीत पत्रामध्ये आनंदी असेल तर आपण पण त्यातच आनंदी. बोळ्याने आपले नशीब नेईल तिथे जावे आणि खेळत रहावे. आयुष्यभर.
का कुणास ठाऊक काही ओळी आठवल्या.
"निगाहें रख आसमान पे
घुमा दे तू रूख दरिया के
तू बनजा वो समंदर कर
पार सके ना कोई
रख आग तू ऐसी अंदर
ललकार सके ना कोई
जाको रखे साइयां
मार सके ना कोई"
कालाय तस्मै नमः. 🙏💐
धनंजय मधुकरराव देशमुख

👍👍👍
ReplyDelete🙏
Delete