लाथा मारणे...
"aai, while I was asleep, she (elder sister) was pushing me with her leg, then I also pushed her with my legs, then she did the same. It went on". रविवार सकाळी, सुट्ट्या असल्या मुळे मुली उशीराच उठल्या. त्यात छोट्या मुलीची ही तक्रार / व्यथा ऐकताना जरा हसू आले.
"'ह्याला लाथा मारणे' अस म्हणतात" अस म्हणुन आम्ही दोघांनी तिला शांत केले 🙂 थोडक्यात, मुली लाथा मारायला शिकल्या याचे आनंद झाले.
लहानपणी आम्ही खूप लाथा मारायचो किंवा झोपेत चालायचो म्हणुन (उन्हाळ्यात अंगणात झोपायचो तेव्हा कधी कधी) पाय हलक्या रस्सीने बांधुन ठेवल्याचे आठवले 😂. असो..
मात्र, "लाथा मारणे " हा गुण किती महत्त्वाचा आहे हे आता कळते.
शाळेत लाथा मारण्याची कला ज्याला जास्त अवगत, तो छान फुटबॉल खेळायचा. आजकाल किकबॉक्सिंग किंवा चेस्टबॉक्सिंग हे नवीन खेळ आले आहेत. "लाथा मारणे " ही कला ह्या खेळांमधे खूप महत्वपूर्ण आहे.
पुढे, शिक्षणाचा प्रवास करतांना - बस, कॉम्पिटिशन, सायकल चालवताना "लाथा मारणे " ही कला खूप कामात यायची! थोडे मोठे झाल्यावर, मुंबई सारख्या शहरात, लोकल मध्ये प्रवास करताना कधी कधी हे खूप उपयोगी पडत. मात्र इथून पुढे "लाथा मारणे "हा प्रकार जरा वेगळया रुपात वापरतो येतो. जसे की, ऑफिस मधील राजकारण, महागाई, बजेट, मित्रा मधील मस्ती असल्या परिस्थिती वर मात करण्यासाठी "लाथा मारणे " हा गुण भौतिक राहत नाही, बौद्धिक होतो. परंतू जमले तर फायदा तुमचाच 🙂
लग्न झाल्यावरही ह्या कलेचे फायदे असतात कारण, आधी नमूद केलेल्या मध्ये, कौटुंबिक राजकारण, मानापमान, हेवे दावे, मुलांचे शिक्षण आणि स्टेटस मेंटेन करण्यात बौद्धिक "लाथा मारणे "चा यशस्वी उपयोग करता येतो.
पण काही विकृत लोक ह्या बौद्धिक "लाथा मारणे " कलेचा अघोरी आनंदा साठी उपयोग करतात आणि कुटुंबात, समाजात क्लेश, कलह निर्माण करतात. 🤔
राजकारणात यशस्वी होण्यासाठी तर "लाथा मारणे " ह्या कलागुणात पारंगत असणे ही मूलभूत पात्रता आहे. 🤣
कधी कधी "लाथा मारणे " ह्या गुणाचा वापर करण्याचा मोह एवढा अनावर होतो की क्रिकेट किंवा लॉन टेनिस खेळाडू सुद्धा ह्याची प्रचीती देतात 🤣
पुढे, जेव्हा वय होतं तेव्हा ह्याचा फायदा नको त्या आजारांना यशस्वी पणे दूर ढकलन्यासाठी होतो. अर्थात जोर आणि जोम कमी होत जातो. पण "लाथा मारणे " हा गुण शेवटापर्यंत टिकवणं किती फायदेशीर होतो हे कळते.. आयुष्याच्या ह्या टप्प्यावर मात्र हे खूप गरजेच असतं. फायदा नेहमी होतोच असे नाही.
तेव्हा, मित्रांनो, "लाथा मारणे " हा गुण / कला किती महत्त्वाची आहे हे लक्षात घ्या, स्वतः मध्ये किंवा मुलांना मध्ये नसेल तर विकसित करा, पारंगत व्हा. असेल तर चांगल्यासाठी यथेच्छ वापर करा . लाथा खाऊ नका, मारा. आनंदी रहा 😂
नमस्कार...
|| ॐ सर्वेशां स्वस्तिर्भवतु (May there be Well-Being in All) ||
|| शुभम भवतु ||
लेखक - धनंजय मधुकर देशमुख

Comments
Post a Comment